शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

लातुरात ११ हजार १११ नारळातून साकारले २१ फुटी शिवलिंग

By admin | Updated: February 26, 2017 00:45 IST

प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वद्यिालयाच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त तब्बल ११ हजार १११ नारळापासून २१ फुट उंचीचा शिवलिंग साकारण्यात आला आहे.

ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. 25 - प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वद्यिालयाच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त तब्बल ११ हजार १११ नारळापासून २१ फुट उंचीचा शिवलिंग साकारण्यात आला आहे. या शिवलिंगाची वंडरबुक आॅफ रेकॉर्डस इंटरनॅशनल या जागतिक विक्रम पुस्तकाने नोंद घेतली आहे़ हा शिवलिंग शिवभक्तांच्या दर्शनासाठी खुला करण्यात आला आहे. भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे. 
महाशिवरात्रीनिमित्त लातुरात प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वद्यिालयाच्या वतीने ११ हजार १११ नारळातून २१ फुट उंचीचा शिवलिंग साकारण्यात आला आहे. या शिवलिंगाचे उद्घाटन झाले़ यावेळी ब्रह्माकुमार कलबुर्गी, सेवाकेंद्राच्या निर्देशिका राजयोगिनी ब्रह्माकुमार विजया बहेन, लातूर सेवा केंद्राच्या संचालिका ब्रह्माकुमारी नंदा व ब्रह्माकुमारी पुन्या त्याचबरोबर प्रमुख पाहूणे म्हणून आमदार बसवराज पाटील, भिमाशंकर पोतीपवळे, अ‍ॅड़ त्र्यंबकदास झंवर, अभिजित देशमुख, वंडर बुक आॅफ रेकॉर्ड्स इंटरनॅशनलच्या समन्वयक डॉ़ स्वर्ण, गुर्रम आदी उपस्थित होते़ हैद्राबादहून आलेल्या डॉ़ स्वर्ण व गुर्रम यांनी शिवलिंगाची पाहणी करून वंडर बुक आॅफ रेकॉर्डस् इंटरनॅशनलमध्ये याची नोंद केली जात असल्याचे जाहीर केले. याबाबतचे त्यांनी लातूरच्या सेवा केंद्राला तसे प्रमाणपत्र देवून सन्मानित केले. महाशिवरात्रीनिमित्त साकारण्यात आलेले शिवलिंग भाविक, भक्तांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे़ ११ दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे. या कार्यक्रमांचा भाविक-भक्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन लातूर केंद्राच्या संचालिका नंदा बहेन, विजया बहेन आणि पुण्या बहेन यांनी केले आहे.