लातूर : जिल्ह्यात दिवसागणिक कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. वाढत्या संसर्गास आळा बसावा, यासाठी शासन प्रशासनस्तरावरून विविध उपयोजना राबविल्या जात आहेत. दुसरी लाट संपत नाही तोवरच तिसरी लाट येणार असल्याचे तज्ज्ञांनी भाकीत केले. आरोग्य यंत्रणेकडून तयारी करण्यात आली असून, एक हजार बेड वाढविण्यात येणार आहेत.
गतवर्षी एप्रिल महिन्यापासून जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळून येण्यास सुरुवात झाली होती. जून ते सप्टेंबर महिन्यात पहिली लाट आली होती. ही लाट ओसरल्यानंतर फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दुसरी लाट धडकली. प्रतिदिन ६०० ते ७०० रुग्णांची भर पडत आहे. दुसरी लाट संपत नाही तोवरच तिसरी लाट येणार असल्याचे तज्ज्ञांनी भाकीत केले आहे. ही लाट रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. १ हजार बेडचे नियोजन करण्यात येणार आहे.
या ठिकाणी बेड वाढविणार
शिरुर अनंतपाळ - १००
औराद शहाजानी - १००
उदगीर - १००
चाकूर १००
प्रशासकीय यंत्रणा तयार
ऑक्सिजन
जिल्ह्यातील क्रिटिकल रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत असते. येत्या काळात उदगीर, निलंगा, वैद्यकीय महाविद्यालय लातूर, महिला रुग्णालय लातूर आदी ठिकाणी हवेतून ऑक्सीजन तयार करणारी यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. त्यामूळे ऑक्सीजनची टंचाई दूर करण्यास मदत होईल.
ऑक्सिजन बेड
जिल्ह्यात १ हजार ५०० हून ओटू बेडची संख्या आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेत आणखीन ऑक्सीजन बेड वाढविण्याची तयारी आरोग्य विभागाने केली आहे. जवळपास ५०० जंबो सिलेंडर खरेदी केली जाणार आहेत.
कोविड केअर सेंटर
जिल्ह्यात सध्या ७ हजार ४०० रुग्णांवर उपचार होईल एवढ्या क्षमतेचे कोविड केअर सेंटर कार्यान्वित आहेत. त्यामुळे गरज पडल्यास इतर ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरु करण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
औषधी
कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी लागणाऱ्या विविध औषधांचा सध्या मुबलक साठा आहे. मात्र, तिसऱ्या लाटेत तुटवडा भासू नये, यासाठी औषधी खरेदी करण्यात आली आहे. त्याचा पूरवठा होत आहे.
कोट...
पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट तीव्र स्वरूपाची आहे. या काळात वेगाने रुग्ण वाढत आहेत. तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे. त्यानुषंगाने तयारी करण्यात आली आहे. एक हजार बेड वाढविण्यात येणार आहे. गरज भासल्यास कोविड केअर सेंटरही सुरू करण्यात येणार आहेत.
डाॅ. एल.एस.देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक