बेलकुंड : औसा तालुक्यातील चिंचोली (का.) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रमाबाई राजेंद्र मस्के यांची तर उपसरपंचपदी सविता नागोराव पवार यांची गुरुवारी बिनविरोध निवड करण्यात आली.
चिंचोली का. ग्रामपंचायतीची सदस्य संख्या ९ असून, या ग्रामपंचायतीत ७ सदस्य बिनविरोध निवडून आले होते. येथील २ जागांसाठी निवडणूक झाली होती. गुरुवारी सरपंच व उपसरपंचांची निवड करण्यात आली. सरपंच पदासाठी रमाबाई मस्के व उपसरपंच पदासाठी सविता पवार यांचे एकमेव अर्ज आल्याने त्यांची या पदांवर बिनविरोध निवड झाल्याचे अध्यासी अधिकारी तथा विस्तार अधिकारी बालाजी पोतदार यांनी जाहीर केले. यावेळी नूतन ग्रामपंचायत सदस्या पूजा कागे, संगीता पाटील, जमेलाबी पठाण, सुनील शेलार, श्रीनिवास गोरे, सतीश पाटील यांच्यासह ग्रामसेवक नीलेश पाटील, दिलीप पाटील, पोलीस हेडकाॅन्स्टेबल दिलीपसिंह चव्हाण उपस्थित होते.