शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल; संजय राऊतांची टीका
2
पीएम मोदींना शिवीगाळ! अमित शाह म्हणाले- 'तुम्ही जितक्या शिव्या द्याल, तितके कमळ फुलेल...'
3
उत्तराखंडमध्ये पुन्हा आभाळ फाटले, दोन ठिकाणी ढगफुटी, 10 जण ढिगाऱ्याखाली; दोन जखमी
4
लग्नानंतर आधार कार्डवरील नाव कसे बदलावे? सोपी ऑनलाइन आणि ऑफलाइन प्रक्रिया जाणून घ्या
5
मुकेश अंबानींनी केली नव्या कंपनीची घोषणा...! आता कोणता बिझनेस करणार? जाणून घ्या
6
Maratha Morcha Mumbai: आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले
7
मध्य प्रदेशातून बेपत्ता झालेली निकिता पंजाबमध्ये सापडली; पळून जाऊन बॉयफ्रेंडशी केलं लग्न
8
थायलंडच्या पंतप्रधान शिनावात्रा यांना मोठा धक्का; कोर्टाने लीक फोन कॉल प्रकरणात ठरवलं दोषी
9
पाकिस्तानला शह देण्यासाठी भारताची नवी खेळी; सौदी अरेबियाला संरक्षण क्षेत्रात दिली मोठी ऑफर
10
'भारताने पाणी सोडले म्हणून मृतदेह वाहत आले...', पाकिस्तानी मंत्र्याने पुन्हा गरळ ओकली
11
लग्न, घटस्फोट अन् आता पुन्हा साखरपुडा... २ वर्षात दोनदा 'प्रेमात'; दुबईची राजकुमारी चर्चेत
12
त्याने BMW थांबवली, मला म्हणाला गाडीत बस अन्...; नम्रता संभेरावने सांगितला बॉलिवूड अभिनेत्याचा 'तो' किस्सा
13
Pakistan Flood : पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार
14
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला सरकारचे सहकार्य: देवेंद्र फडणवीस
15
Jio IPO: जिओचा आयपीओ कधी येईल? रिलायन्सच्या वार्षिक बैठकीत मुकेश अंबानी यांनी सांगितली तारीख
16
Samsung Galaxy A17: २० हजारांत जबरदस्त फीचर्स; सॅमसंगच्या 5G फोनची बाजारात एन्ट्री!
17
"शिवरायांची शपथ घेऊन आरक्षण देऊ म्हणणारे गावी पळाले"; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर निशाणा
18
३० KM मायलेजसह लवकरच लॉन्च होणार Maruti Fronx Hybrid, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स...
19
ITR भरण्याची डेडलाइन वाढली! पण 'या' चुका टाळा; नाहीतर ५,००० रुपयांचा बसेल भुर्दंड
20
५०० साड्या, ५० किलो दागिने आणि चांदीची भांडी घेऊन बिग बॉसच्या घरात पोहोचली 'ती'

लातूर जिल्ह्यात सर्वदूर पाऊस; नद्या, नाले वाहू लागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:25 IST

रेणापूर तालुक्यात आठ दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे तसेच मुरंबी व जोगाईवाडी धरणे भरल्याने रेणा मध्यम प्रकल्प हा पूर्ण क्षमतेने ...

रेणापूर तालुक्यात आठ दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे तसेच मुरंबी व जोगाईवाडी धरणे भरल्याने रेणा मध्यम प्रकल्प हा पूर्ण क्षमतेने मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता भरला. त्यामुळे प्रथम साडेदहा वाजता रेणा मध्यम प्रकल्पातून दोन दरवाजे उघडून नदीपात्रात पाणी सोडून देण्यात आले. दुपारी पावणेएक वाजता प्रकल्पाचे सहाही सर्व दरवाजे उघडण्यात आले. सोमवारी रात्री आठ वाजल्यापासून मंगळवारी दिवसभर संततधार सुरूच आहे.

उदगीर तालुक्यात मंगळवारी पहाटेपासून पडलेल्या जोरदार पावसामुळे तालुक्यातील सर्वच नदी-नाल्यांना पाणी आले आहे. तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतामध्ये ठीकठिकाणी पाणी साचले आहे. काढणीसाठी आलेले उडीद व मुगाच्या शेंगांना आता कोंब फुटू लागले आहेत. अहमदपूर तालुक्यातील खानापूर येथे किनगाव - लातूर राज्यमार्गावरील पूल पाण्याखाली गेला असून वाहतूक पूर्णपणे खंडित झाली आहे. अहमदपूर शहरात सोमवारी रात्रीपासून मंगळवार दुपारपर्यंत पाऊस पडल्याने शहरातील नांदेड रोडवरील कराड नगर भागातील काही नागरिकांच्या घरांत नालीचे पाणी शिरले. निलंगा तालुक्यासह औराद परिसरातील तेरणा व मांजरा या दाेन्ही नद्यांना पूर आला आहे. नदीवरील सर्व बंधारे भरल्याने पाणी सोडण्यात आले आहे. नदीपलीकडील कर्नाटक व महाराष्ट्रातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. औरादसह परिसरातील अनेक गावांत सखल भागात पाणी साचले आहे. अनेक घरांची पडझड झाली आहे. लातूर शहरातील खनी भागातील गायत्रीनगर येथे गटारीचे पाणी तुंबल्याने ते काही घरांत शिरले. त्यामुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागला. चाकूर, जळकाेट, देवणी, शिरूर अनंतपाळ आदी तालुक्यांतील नाले वाहत आहेत.

मांजरा प्रकल्पात ६१ टक्के पाणी...

लातूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पात २४ तासात १० टक्के पाण्याची वाढ झाली आहे. प्रकल्प क्षेत्रात चांगला पाऊस होत असल्याने पाण्याचा येवा सुरू असल्याची माहिती शाखा अभियंता शाहूराज पाटील यांनी दिली.