शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

लातूर जिल्ह्यात भेसळीच्या संशयाने धाडी; दूध, पेढ्याचे घेतले नमुने

By हरी मोकाशे | Updated: September 15, 2023 20:06 IST

लातूर जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाची मोहीम

लातूर : सणासुदीच्या काळात नागरिकांना भेसळमुक्त, शुद्ध, ताजे व उत्तम प्रतिचे दूध व दुग्धजन्य पदार्थ मिळावेत म्हणून महिनाभरात जिल्ह्यातील विविध ठिकाणी धाडी टाकून दूध, खवा व पेढ्याचे ३२ नमुने घेण्यात आले आहेत. त्यात भेसळ, विनापरवाना अन्न पदार्थ विक्री केल्याचे आढळून आल्यास अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्यात येणार आहे.

राज्य शासनाच्या निर्देशानुसार अप्पर जिल्हाधिकारी सुनील यादव यांच्या अध्यक्षतेखाली दूध भेसळ रोखण्यासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. सणासुदीच्या काळात नागरिकांना भेसळमुक्त, शुद्ध, ताजे व उत्तम प्रतीचे दूध व दुग्धजन्य पदार्थ मिळावेत म्हणून जिल्हा दुग्ध विकास अधिकाऱ्यांसमवेत १८ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यातील २१ दूध डेअरी, खवा, पेढा भट्टी व दुकाने, दूध संकलन केंद्रांची तपासणी करण्यात आली. त्यात संशयित आढळलेले दूध, खवा, पेढ्यांचे ३२ नमुने घेण्यात येऊन ते तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत.

पदार्थ बनविताना काळजी घ्या...गणेशोत्सव, दसरा आदी सणासुदीच्या काळात विविध मंडळातर्फे भंडारा, प्रसाद, अन्नदान असे कार्यक्रम घेण्यात येतात. अन्नपदार्थ, प्रसाद तयार करताना मंडळ, अन्न व्यावसायिक, उत्पादकांनी अन्नसुरक्षा नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. तसेच प्रसाद वितरण करणाऱ्या मंडळांनी संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करुन नाममात्र शुल्क भरुन प्रमाणपत्र घ्यावे. प्रसाद तयार करण्याची जागा स्वच्छ असावी, साहित्य परवानाधारक विक्रेत्यांकडून खरेदी करावे. प्रसादासाठीची भांडी स्वच्छ असावी. आवश्यक तेवढाच प्रसाद करावा.

बेस्ट बिफोरचा बोर्ड लावावा...स्वीट मार्ट धारकांनी स्वच्छ, ताजी मिठाई, मोदक तयार करून विक्री करावी. कच्चा माल हा परवानाधारक अथवा नोंदणीकृत अन्न व्यवसायिकाकडून खरेदी करावा. त्याची पक्की बिले घेऊन जतन करून ठेवावी. मिठाईच्या ट्रेसमोर बेस्ट बिफोरचा बोर्ड लावावा. दूध व दुग्धजन्य पदार्थ व्यावसायिकांनी अन्न परवाना घेतल्याशिवाय व्यवसाय करू नये. अन्यथा संबंधितांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल.- शि.बा. कोडगिरे, सहाय्यक आयुक्त, अन्न.

भेसळीसंदर्भात तक्रार करा...नागरिकांना दूध व दुग्धजन्य पदार्थाबाबत काही तक्रार अथवा जिल्ह्यात कोठेही भेसळ होत असल्याचे दिसून आल्यास अन्न व औषध प्रशासन कार्यालयास अथवा १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनचे सहायक आयुक्त शि. बा. कोडगिरे यांनी केले आहे.

टॅग्स :laturलातूरFood and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभाग