दुसरी घटना अहमदपूर हद्दीतच भाजी मंडई येथे उघडकीस आली. विष्णू हेमराज राऊत्रे (रा. गवळी गल्ली, अहमदपूर) हा स्वत:च्या फायद्यासाठी लोकांकडून पैसे घेऊन कल्याण नावाचा मटका चालवत असल्याचे मिळून आला. यावेळी त्याच्याकडून ३ हजार ११० रुपये रोख, एक मोबाईल असा एकूण ११ हजार ११० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तिसरा छापाही अहमदपूर हद्दीतील शिरूर ताजबंद येथे लाकडी अड्ड्यासमोरील मोकळ्या जागेत टाकण्यात आला. येथे बालाजी उर्फ पिंटू बळीराम संमुखराव (रा. साठे नगर, अहमदपूर) हा स्वत:च्या फायद्यासाठी लोकांकडून पैसे घेऊन आकड्यावर लावून कल्याण नावाचा मटका चालवत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी त्याच्याकडून ४ हजार ३०० रोख, एक मोबाईल असा एकूण ६ हजार ३१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या तिन्ही घटनेत अहमदपूर पोलिसात कलम १२ (अ) मुंबई जुगार कायद्याप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या आदेशान्वये सदर कारवाई विशेष पोलीस पथकाने केली.
कल्याण मटका जुगारावर छापा, ६९ हजारांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:25 IST