शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

सरकारी दवाखान्यांची गुणवत्ता वाढली; लातूर जिल्ह्यातील १५५ आरोग्य संस्थांचा गौरव

By हरी मोकाशे | Updated: March 13, 2024 16:56 IST

कायाकल्प योजना : राज्यात सर्वाधिक पारितोषिक लातूर जिल्ह्यास

लातूर : सरकारी रुग्णालयातील स्वच्छता व इतर पूरक बाबींसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानअंतर्गत घेण्यात आलेल्या कायाकल्प उपक्रमात जिल्ह्यातील ३२ प्राथमिक आरोग्य केंद्र, १११ उपकेंद्र तसेच स्त्री रुग्णालय, उदगीरचे सामान्य, निलंग्याचे उपजिल्हा आणि ९ ग्रामीण रुग्णांनी पारितोषिके मिळविली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सरकारी दवाखान्यांची सेवा गुणवत्ता वाढल्याचे दिसून येत आहे. विशेषत: राज्यात सर्वाधिक पारितोषिक मिळविणारा लातूर जिल्हा ठरला आहे.

राज्य शासन आणि स्वच्छ रुग्णालयांसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानअंतर्गत कायाकल्प स्पर्धा घेतली जातेे. या उपक्रमात सहभागी सरकारी रुग्णालयांची अंतर्गत स्वच्छता, प्रसाधनगृहांची स्थिती, इमारतींची स्थिती, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, रुग्णालय परिसर स्वच्छता, आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण, नोंदी, शस्त्रक्रियागृह, बाह्यरुग्ण व आंतररुग्ण विभागातील सोयी- सुविधा आदी मुद्द्यांवर परीक्षण केले जाते. दरम्यान, शासनाने नियुक्त केलेल्या पथकाकडून जिल्ह्यातील सरकारी आरोग्य संस्थांची तपासणी करण्यात आली होती.

कासार बालकुंदा आरोग्य केंद्र प्रथम...जिल्ह्यात कासार बालकुंदा आरोग्य प्रथम आले असून २ लाखांचे बक्षीस जाहीर झाले आहे. निटूर, हंडरगुळी, हलगरा, हडोळती, शिरुर ताजबंद, लामजना, वांजरवाडा, देवर्जन, हेर, गुडसूर, अतनूर, जवळा बु., नळेगाव, नळगीर, अंधोरी, पानचिंचोली, चिंचोली ब., जवळगा, बोरी, निवळी, तांदुळजा, गंगापूर, उजनी, चापोली, खरोळा, कारेपूर, भातांगळी, चिखुर्डा, मातोळा, भादा, बिटरगाव अशा ३१ प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्रत्येकी ५० हजारांचे बक्षीस जाहीर झाले आहे.

किनी यल्लादेवी उपकेंद्र प्रथम...उदगीर तालुक्यातील किनी यल्लादेवी आरोग्य उपकेंद्र हे जिल्ह्यात प्रथम आले असून एक लाखाचे बक्षीस जाहीर झाले आहे. काजळ हिप्परग्यास ५० हजार, घोणसी उपकेंद्रास ३५ हजार तर उर्वरित १०८ उपकेंद्रांना प्रत्येकी २५ हजारांचे बक्षीस मिळणार आहे. या उपक्रमासाठी जिल्हा परिषदअंतर्गतच्या जिल्हा गुणवत्ता समन्वयक डॉ. पल्लवी रेड्डी, जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अर्चना पंडगे यांनी पाठपुरावा केला.

स्त्री रुग्णालयाने मिळविले यश...कायाकल्प उपक्रमात जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाअंतर्गतच्या लातुरातील स्त्री रुग्णालय, उदगीरचे सामान्य आणि निलंग्याचे उपजिल्हा तसेच अहमदपूर, रेणापूर, देवणी, किल्लारी, उदगीर, चाकूर, बाभळगाव, मुरुड येथील ग्रामीण रुग्णालयांनी यश मिळविले आहे.

आरोग्य संस्था अद्ययावत करण्यासाठी प्रयत्न...राष्ट्रीय आरोग्य अभियानअंतर्गतच्या कायाकल्प उपक्रमात लातूर जिल्ह्याने चांगले यश संपादन केले आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नामुळे आणि सहकार्यामुळे हे यश मिळाले आहे. विविध योजनांच्या माध्यमातून सरकारी आरोग्य संस्था आणखीन अद्ययावत करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत.- अनमोल सागर, मुख्य कार्यकारी अधिकारी.

सेवेचा दर्जा कायम टिकविण्यासाठी प्रयत्न...कायाकल्पमध्ये जिल्हा आरोग्य विभाग आणि जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाअंतर्गतच्या रुग्णालयांनी आपला लौकिक केला आहे. गुणवत्तापूर्ण सेवा देण्याबरोबर संस्थेचा दर्जा वाढविण्यासाठी उपक्रमातून प्रयत्न करण्यात आले. तो टिकविण्यासाठी कायम प्रयत्न राहणार आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच.व्ही. वडगावे, जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. प्रदीप ढेले यांनी सांगितले.

टॅग्स :laturलातूरhospitalहॉस्पिटल