शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

दूध डेअरीच्या पुनरुज्र्जीवनासाठी पाठपुरावा करणार; मंत्री संजय बनसोडे यांची ग्वाही

By संदीप शिंदे | Updated: August 18, 2023 16:14 IST

उदगीर येथे शासकीय दूध योजना पुनरुज्र्जीवन समिती व नागरिकांची बैठक शिवाजी महाविद्यालयात पार पडली.

उदगीर : परिसरातील शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती यावी, या उद्देशाने निर्माण करण्यात आलेली दूध डेअरी व दूध भुकटी प्रकल्प मागील काही काळापासून बंद असला तरी आगामी काळात हा प्रकल्प पुनरुज्र्जीवित करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार आहे. त्यासाठी लागणारा निधीही उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही क्रीडा व युवक कल्याणमंत्री संजय बनसोडे यांनी येथे दिली.

उदगीर येथे शासकीय दूध योजना पुनरुज्र्जीवन समिती व नागरिकांची बैठक शिवाजी महाविद्यालयात पार पडली. यावेळी ते बोलत होते. मंचावर तहसीलदार रामेश्वर गोरे, मुख्याधिकारी शुभम क्यातमवार, महिला काँग्रेसच्या प्रदेश सचिव उषाताई कांबळे, आशिष पाटील, संतोष कुलकर्णी, अहमद सरवर, मोतीलाल डोईजोडे आदी उपस्थित होते. क्रीडामंत्री संजय बनसोडे म्हणाले, उदगीर मतदारसंघाच्या विकासाचा बॅकलॉग भरण्याचे काम सध्या सुरू आहे. वाॅटर ग्रीडसारखी महत्त्वाकांक्षी योजना आपल्या भागात सुरू असून, दूध डेअरी व एमआयडीसी सारखे प्रकल्प सुरू झाले पाहिजेत, अशी भूमिका आहे. त्यामुळे उदगीर येथील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा व अनेकांना रोजगार देणारा शासकीय दूध डेअरी व दूध भुकटी प्रकल्पाचे पुनरुज्र्जीवन करण्याचा माझा मानस आहे. प्रकल्पाची मशिनरी कालबाह्य झाली असेल तर संपूर्ण प्रकल्प नव्याने सुरू करण्यासाठी लागेल तेवढा निधी उपलब्ध करून देण्याची हमी मी या भागाचा लोकप्रतिनिधी या नात्याने संबंधित खात्याला देणार असल्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

इतर पर्यायांसाठी मानसिक तयारी ठेवावी...दूध भुकटी प्रकल्प पुनरुज्र्जीवित करण्यासाठी शासकीय स्तरावरून काही अडचणी आल्यास इतर पर्याय म्हणजेच अमूल डेअरी सारख्याने जर हा प्रकल्प सुरू करण्यास रुची दाखवल्यास या भागातील नागरिकांनी मानसिक तयारी ठेवावी, असे वैयक्तिक मत असल्याचेही क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले. यावेळी बाजार समितीचे माजी सभापती सिद्धेश्वर पाटील, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन भरत चामले, प्रा.एस.एस. पाटील, व्यंकटराव पाटील, बलसुरकर आदींनी सूचना मांडल्या.

टॅग्स :laturलातूरMilk Supplyदूध पुरवठा