गेल्या काही दिवसांत शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. कोरोनापासून बचाव करण्यासाठी प्रत्येकाने घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा, शारीरिक अंतराच्या नियमाचे पालन करावे, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने वारंवार केले जात आहे. असे असतानाही अनेक नागरिक विनामास्क सार्वजनिक ठिकाणी वावरत आहेत. आवाहन करूनही नागरिक प्रतिसाद देत नसल्याने पालिकेच्या वतीने आता दंडात्मक कारवाई केली जात आहे. जे नागरिक विनामास्क आढळतील त्यांच्याकडून आर्थिक स्वरूपात दंड वसूल केला जात आहे. केवळ दंड वसूल करून पालिकेचे कर्मचारी थांबत नाहीत तर अशा नागरिकांना लगेचच मास्क देऊन तो वापरण्याची विनंती केली जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शहरातील नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा. बाजारपेठ अथवा सार्वजनिक ठिकाणी शारीरिक अंतराच्या नियमाचे पालन करावे, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
मास्कचा वापर न केल्या दंडात्मक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:19 IST