तालुक्यातील देवर्जन, हंडरगुळी, नळगीर, हेर, वाढवणा (बु.) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत २२ हजार १०१ बालकांना तर शहरातील १४ हजार ३०० बालकांना पोलिओची मात्रा देण्यात येत आहे. या मोहिमेसाठी ग्रामीण भागात १६४ बुथ तर शहरी भागात ८५ बूथ निर्माण करण्यात आले. प्रत्येक युनिटवर एका वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. तसेच ६४९ कर्मचारी नियुक्त केले आहेत. शहरात ६, ग्रामीण भागासाठी ८ मोबाइल टीम आहेत. बूथवरील रविवारच्या कामानंतर शहरात प्रत्येक घरी जाऊन मुलांना पोलिओ डोस दिला की नाही? याची खात्री केली जाणार आहे. ज्या बालकांनी रविवारी डोस घेतला नाही? त्यांना घरी जाऊन डोस देण्यात येणार आहे. पालकांनी आपल्या ० ते ५ वर्ष वयोगटातील बालकांना पोलिओचा डोस देण्याचे आवाहन डॉ. कापसे यांनी केले आहे.
उदगिरात पल्स पोलिओ लसीकरण मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:22 IST