रुग्णालय, मेडिकल आणि पेट्रोल पंप वगळता इतर सर्वच व्यवहार बंद ठेवण्यात आले हाेते. भविष्यात सोशल डिस्टन्स पाळणे, मास्कचा परिपूर्ण वापर करणे, वारंवार हात स्वच्छ धुणे हे सर्व नियम नागरिकांनी पाळावे. आपण आणि आपल्या कुटुंबास सुरक्षित ठेवावे, असे आवाहन नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे यांनी केले. जर कोणास अडचण आल्यास नगरपालिकेशी संपर्क करावा, असेही शिंगाडे म्हणाले. हॉटेल, पान टपरी याठिकाणी नागरिक जास्त प्रमाणात गर्दी करीत असून, ही बाब अतिशय गंभीर आहे. हॉटेल मालकांनी सर्व गोष्टींची काळजी घ्यावी, अन्यथा कारवाई करावी लागेल. निलंगा आगारप्रमुख युवराज थडकर यांच्याशी संपर्क साधून, नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे यांनी सूचना केल्या आहेत. एसटी बसेस खचाखच भरून येत आहेत. मास्कशिवाय एसटीत प्रवेश देऊ नये, प्रत्येकाने आपल्या कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकांना घराबाहेर पडू देऊ नये, त्यांची काळजी घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे. त्याचबराेबर भविष्यातही प्रशासनाकडून आलेल्या सूचनांचे नागरिकांकडून पालन व्हावे, असे ते म्हणाले.
निलंग्यात जनता कर्फ्यू, कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:22 IST