शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अन्नपचनासाठी योग्य आहार महत्वाचा; शिळे अन्न खाणे टाळावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 18:05 IST

उन्हाळ्यात होणाऱ्या विविध आजारांना टाळण्यासाठी  दक्षता हाच उत्तम मार्ग आहे़

उस्मानाबाद : बदलत्या तापमानाचा मानवी आरोग्यावर मोठा परिणाम होतो़ विशेषत: हिवाळ्यातून उन्हाळ्याच्या वातावरणात बदल होताना मानवी अन्नपचन प्रक्रियेवरही परिणाम होतो़ रात्रीच्यावेळी शिळे अन्न खाल्ल्याने विषबाधा होण्याची शक्यताही अधिक वाढते़ त्यामुळे उन्हाळ्यात शिळे अन्न खाणे टाळणे गरजेचे असल्याची माहिती जिल्हा रूग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ राजाभाऊ गलांडे यांनी दिली़

उन्हाळ्यात होणाऱ्या विविध आजारांना टाळण्यासाठी  दक्षता हाच उत्तम मार्ग आहे़ हिवाळ्याच्या कालावधीत मानवांची अन्नपचन प्रक्रिया चांगली असते़ विशेषत: हिवाळ्यात अन्न खराब होण्याचे प्रकार घडत नाहीत़ उलट उन्हाळ्यात या प्रकारात वाढ होते़ योग्य दक्षता न घेतल्यास अन्नातील भाजी विटण्याचे प्रमाण वाढते़ असे अन्नपदार्थ विशेषत: शिळा मांसाहार झाला तर विषबाधा होऊ शकते़ हा प्रकार टाळण्यासाठी अबालवृध्दांनी उन्हाळ्याच्या कालावधीत शिळे अन्न खाणे टाळणे गरजेचे आहे़ उन्हात शारीरिक श्रम अधिक करणाऱ्या नागरिकांना उष्माघात होण्याची शक्यता असते़ उष्माघात होऊ नये म्हणून उन्हापासून बचावासह अधिक प्रमाणात पाणी पिणे गरजेचे आहे़ विशेषत: बाटलीबंद शितपेय अधिक काळ टिकावीत म्हणून त्यात रासायनिक घटक मिसळलेले असतात़ त्यामुळे अशी  शितपेये पिणेही टाळणे गरजेचे आहे़ 

एकीकडे उन्हाळा आणि पाण्याची टंचाई असा दुहेरी प्रश्न जिल्ह्यातील नागरिकांसमोर आहे़ मात्र, स्वच्छ पाण्याचा अधिक काळ साठा झाला तर डासांची पैदास होऊन डेंग्यू, चिकन गुनिया, काविळ आदी आजारांचा फैैलाव होऊ  शकतो़ त्यामुळे आठवड्यातून एक वेळेस कोरडा दिवस पाळणे गरजेचे आहे़ शिवाय घराच्या परिसरात नाल्या तुंबल्या असतील तर तेथेही डासांची पैदास होते़ त्यामुळे हत्तीरोग, मलेरियासह इतर आजारांना निमंत्रण मिळू शकते़ त्यामुळे परिसरातील नाल्याही वाहत्या राहतील, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे़ याशिवाय उन्हाळ्यात स्वाईन फ्ल्यू, चक्कर येणे, ज्वर आदी विविध आजारांची  लागण होण्याची शक्यता असते़ अशा आजारांपासून बचाव करण्यासाठी उन्हापासून बचाव करणे, पुरेसा आहार, पाणी भरपूर पिणे, पुरेसी झोप घेणे गरजेचे आहे़ काही शारीरिक त्रास होत असतील तर अधिक वेळ न घालविता जवळील तज्ज्ञ डॉक्टरांशी तात्काळ  संपर्क साधून उपचार घेणेही तितकेच गरजेचे  असल्याचे गलांडे यांनी सांगितले़

वैयक्तिक स्वच्छता महत्त्वाचीआपल्याला आजाराची लागण होऊ नये, यासाठी आपण वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष देणे गरजेचे आहे़ जेवणापूर्वी, पाणी पिताना हात स्वच्छ धुणे, घराचा परिसर स्वच्छ ठेवणे, आठवड्यातून एकवेळेस कोरडा दिवस पाळणे आदी उपाययोजना केल्या तर अनेक आजारांना दूर ठेवता येते़

टॅग्स :foodअन्नfood poisoningअन्नातून विषबाधाdoctorडॉक्टरlaturलातूर