शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ महिला फिर्यादीवरच पोलीस प्रशासनाचा दबाव

By admin | Updated: April 15, 2017 00:20 IST

लातूर : बाभळगाव येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील लिपिक चंद्रकांत जाधव याच्यावर लातूरची पोलीस यंत्रणा आणि या प्रकरणातील तपास अधिकारी ‘मेहरबान’ झाले

लातूर : बाभळगाव येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील लिपिक चंद्रकांत जाधव याच्यावर लातूरची पोलीस यंत्रणा आणि या प्रकरणातील तपास अधिकारी ‘मेहरबान’ झाले असून, त्याच्या अटकपूर्व जामिनासाठी ‘क्लिनचिट’ दिली जात आहे. विशेष म्हणजे फिर्यादी महिला लोभा गणेश कांबळे यांच्यावर पोलिसांकडून जाणीवपूर्वक दबाव आणला जात आहे. बाभळगाव येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात लोभा कांबळे या कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत आहेत़ याच कार्यालयातील प्रमुख लिपिक चंद्रकांत जाधव हा त्यांना २००९ पासून छळत आहे़ या प्रकरणात अनेकदा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली. मात्र छळाला कंटाळलेल्या महिलेला कुठलाही न्याय मिळाला नाही़ १३ जानेवारी २०१७ रोजी पोलीस महासंचालकाकडे लोभा कांबळे यांनी लेखी तक्रार केली होती़ या प्रकरणात लोभा कांबळे यांच्या तक्रारीची चौकशी न करता उलट चौकशीच्या नावाखाली त्यांचाच छळ केला जात होता. अखेर या छळाला कंटाळून ६ एप्रिल २०१७ रोजी बाभळगाव प्रशिक्षण केंद्रातील उपप्राचार्यांच्या दालनात लोभा कांबळे यांनी विषारी द्रव घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला़ या प्रकरणात पोलिसांनी तब्बल पाच दिवसांनंतर चंद्रकांत जाधव याच्यावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला. मात्र, गेल्या सहा दिवसांपासून अद्यापही चंद्रकांत जाधव याला अटक करण्याचे धाडस पोलिसांनी दाखविले नाही़ चौकशीच्या नावाखाली पोलिसांकडूनच फिर्यादी महिलेवर दबाव आणला जात असून, सोयीचा जबाब देण्याचेही सांगितले जात आहे.आरोपीसाठी धडपड...चंद्रकांत जाधव याच्यावर विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला अटक न करता जाणीवपूर्वक तपास यंत्रणेकडून ढिल दिली जात आहे. त्याला अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी पोलिसांकडूनच त्यांची अटक टाळली जात असल्याचा आरोप कांबळे यांनी केला आहे. माहिती देण्यास टाळाटाळचंद्रकांत जाधव याच्यावर शहरातील पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची चर्चा सध्या पोलीस वर्तुळात आहे. याबाबत लोभा कांबळे यांनी लातूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण आणि शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक नानासाहेब उबाळे यांच्याकडे गुन्ह्याची माहिती मिळावी, असा लेखी अर्जही केला आहे. यासाठी त्यांनी माहिती अधिकारातही अर्ज केला आहे. मात्र, चंद्रकांत जाधवबाबतची माहिती देण्यास यंत्रणेकडून जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात आहे, असा आरोपही कांबळे यांनी केला आहे.