या निवडणुकीत डॉ. कल्याण बरमदे विजयी झाले. सदरील प्रक्रिया पार पाडण्यासाठी आयएमए निवडणूक आयोगाचे सदस्य डॉ. सुरेश भट्टड, डॉ. सूर्यकांत निसाले, डॉ. डी.एन. चिंते, डॉ. संजय वारद, डॉ. सुरेखा काळे, डॉ. विश्वास कुलकर्णी यांनी सहकार्य केले. लातूर आयएमए असोसिएशनने चार दशकापासून डॉक्टरांच्या विविध समस्यांची सोडवणूक करण्याबरोबरच विविध सामाजिक उपक्रमांमध्येही आपला कायम सक्रिय सहभाग नोंदवलेला आहे. आयएमएच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेल्या मान्यवरांमध्ये पद्मभूषण डॉ. अशोकराव कुकडे, माजी खा. डॉ. गोपाळराव पाटील, डॉ. हंसराज बाहेती, डॉ. एम.एस. भातांब्रे, डॉ. ईश्वर राठोड, डॉ. डी.एन. चिंते, डॉ. एस.एन. जटाळ, डॉ. अजय जाधव, डॉ. रमेश भराटे, डॉ. आरदवाड, डॉ. डी.बी. गोरे यांचा समावेश आहे. आयएमए लातूर शाखेने वैद्यकीय सेवेसोबतच जलयुक्त लातूर, लातूर ग्रीन, लातूर वृक्ष यासारख्या सामाजिक उपक्रमांमध्येही आपला सक्रिय सहभाग नोंदवला आहे. कोरोना महामारीच्या काळातही आयएमएने उल्लेखनीय असे कार्य केले आहे. डॉ. कल्याण बरमदे यांच्या या निवडीबद्दल डॉ. डी.एन. चिंते, डॉ. एस.एन. जटाळ, डॉ. आरदवाड, डॉ. बाहेती , डॉ. अजय जाधव, डॉ. अजय पुनपाळे, डॉ. दत्ता गोजमगुंडे, डॉ. अनिल वलसे, डॉ. गणेश स्वामी, डॉ. रमेश भराटे, डॉ. हर्षवर्धन राऊत, डॉ. अविनाश देशमुख आदींनी कौतुक केले आहे.
आयएमएच्या अध्यक्षपदी डॉ. कल्याण बरमदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:19 IST