लातूर : शहरासह जिल्ह्यात दरराेज सरासरी तीन माेटरसायकल चाेरीच्या घटना घडत आहे. जानेवारी ते डिसेंबर २०२० अखेर जवळपास १ हजार ९५ माेटारसायकल चाेरट्यांनी पळविल्या आहेत. माेटारसायकल चाेरीचा टक्का अलिकडे वाढला असून, यातील केवळ ६५ माेटारसायकली पाेलिसांच्या हाती लागल्या आहेत. चाेरीनंतर ही वाहने जातात कुठे? हे काेडेही पाेलिसांना न उलगडणारे आहे.
लातूर शहर आणि जिल्ह्यातील बाजारपेठेत असलेल्या गर्दीवर नजर ठेवत पार्किंगमधील माेटारसायकली पळविण्याच्या घटना अलिकडे माेठ्या प्रमाणात वाढल्या. यातील आराेपींच्या मागावर पाेलीस आहेत. मात्र, ते हाती लागत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. वर्षभरात केवळ ६५ माेटारसायकली तपासातून हाती लागल्या आहेत. यात ११ जणांना अटक करता आले. माेटार सायकल चाेरीमध्ये स्थानिकांसह इतर जिल्ह्यातील आराेपी असल्याचे समाेर आले आहे.
अल्प किंमतीत दुचाकींची विक्री...
लातूर आणि जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणावरुन पळविण्यात आलेल्या माेटारसाायकलींची अल्प किंमतीत विल्हेवाट लावली जात असल्याचे समाेर आले आहे. काही वाहनांचे सुटे पार्ट काढून विकले जात असल्याची धक्कादायक माहिती समाेर आली आहे. यातून जिल्ह्यात माेठे रॅकेट सक्रिय असल्याचा अंदाज आहे.
११ जणांना अटक
माेटारसायकल चाेरीप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा आणि इतर पाेलीस ठाण्यांच्या कर्मचाऱ्यांनी जवळपास ११ जणांना अटक केली आहे. माेटारसायल चाेरणारी टाेळी आणि त्यातील संख्या माेठी आहे. प्रमुख आराेपींचा पत्ता पाेलिसांना अद्यापही लागाला नाही. पाेलीस त्यांच्या मागावरच आहेत.
जिल्ह्यात दरराेज सरासरी ३ माेटार सायकल चाेरीच्या घटना घडतात. वर्षाला हा आकडा जवळपास तब्बल १ हजार ९५ च्या घरात जाताे. यामध्ये टाेळ्या सक्रिय आहेत का? हे सांगणे कठिण आहे. मात्र, यात स्थानिक आणि परजिल्ह्यातील चाेरट्यांचा सहभाग असल्याचे समाेर आले आहे. टाेळी हाती लागली की, त्याची उकल हाेते.
- निखिल पिंगळे, पोलीस अधीक्षक, लातूर