शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

लातूरमध्ये पाणीपट्टी, घरपट्टी वसुलीचा विक्रम; ६० कोटी ४९ लाखांची वसुली

By हरी मोकाशे | Updated: April 9, 2023 15:11 IST

काय म्हणता, जिल्ह्यातील ३१ गावचे नागरिक करमुक्त!

हरी मोकाशे, लातूर : ग्रामीण भागातील पाणीपट्टी, घरपट्टी वसुली म्हणजे ग्रामपंचायतींपुढील कठीण अन् किचकट प्रश्न. मात्र, जिल्हा परिषदेच्या सीईओंच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या विशेष कर वसुली दिनामुळे ही समस्या निकाली निघाली आहे. मार्चअखेरपर्यंत ६२ कोटी ५६ लाख २४ हजारांपैकी ६० कोटी ४९ लाख ८८ हजारांची कर वसुली झाली आहे. विशेष म्हणजे, ३१ ग्रामपंचायतींतील नागरिकांनी शंभर टक्के कर भरणा केल्याने ही गावे मालामाल झाली असून गावकरीही करमुक्त झाले आहेत.

कुठल्याही ग्रामपंचायतींची घरपट्टी, नळपट्टी नियमित वसूल होत नसल्याने त्याचा गावच्या विकासावर परिणाम होतो. त्यामुळे मुलभूत सुविधाही पुरविणे ग्रामपंचायतीस कठीण होते. जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत आत्मनिर्भर व्हावी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी गेल्या वर्षीपासून दर महिन्यास विशेष कर वसुली मोहीम राबविण्यास सुरुवात केली.

सुरुवातीस जिल्ह्यातील ७८६ ग्रामपंचायतींतून अल्प प्रतिसाद मिळाला. मात्र, ग्रामपंचायतीचे स्वउत्पन्न वाढविल्याशिवाय गावात नवीन उपक्रम राबविणे शक्य नाही. शिवाय, शासनाच्या निधीवर अवलंबून राहिल्यास गावचा विकासही साधता येणार नाही, हे या विशेष मोहिमेच्या माध्यमातून पटवून देण्यात आले.

इतिहासात पहिल्यांदाच ९७ टक्के वसुली...

सन २०२२-२३ या वर्षात पाणीपट्टी व घरपट्टीपोटी एकूण ६२ कोटी ५६ लाख २४ हजार रुपयांची वसुली अपेक्षित होती. मार्चअखेरपर्यंत एकूण ६० कोटी ४९ लाख ८८ हजार रुपयांची वसुली झाली आहे. जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात कर वसुली झाली आहे.

ग्रामपंचायत बरखास्तीची धास्ती...

७० टक्क्यांपेक्षा कमी कर वसुली झाल्यास ग्रामपंचायत बरखास्त करण्यात येईल, अशी सूचना प्रशासनाकडून करण्यात आली होती. त्यामुळे ग्रामसेवकांसह सरपंच, उपसरपंचांचा ताण वाढला होता. या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन वसुली केल्याने जिल्ह्यातील एकाही ग्रामपंचायतीची ७० टक्क्यांपेक्षा कमी वसूली झालेली नाही.

शंभर टक्के कर वसुलीची गावे...

लातूर : खाडगाव, सिकंदरपूर, वरवटी, बोरगाव. औसा : आपचुंदा, उटी बु., करजगाव, किल्लारी, खुंटेगाव, जवळगा पो., जायफळ, दावतपूर, फत्तेपूर, बेलकुंड, भादा, मंगरुळ, माळकोंडजी, लिंबाळा दा., वडजी, हिप्परगा क. अहमदपूर : केंद्रेवाडी, परचंडा, बोडका. रेणापूर : भंडारवाडी, खानापूर, नरवटवाडी, रामवाडी, तळणी. शिरुर अनंतपाळ : लक्कड जवळगा, तुरुकवाडी. देवणी : नागतीर्थवाडी.

लातूरचा राज्यभर लौकिक...

पहिल्यांदाच जवळपास ९८ टक्के कर वसुली झाली असून हा लातूर पॅटर्न राज्यभर होईल. कर वसुलीतून प्राधान्याने पथदिवे व पाणीपुरवठ्याचे वीजबिल भरणा करणे तसेच गावातील स्वच्छता आणि पाणीपुरवठाविषयक कामे करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. - दत्तात्रय गिरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत.

गावकऱ्यांचे सहकार्य...

पायाभूत सुविधांसाठी कर भरणा आवश्यक असल्याचे गावकऱ्यांना सांगितले. गावकऱ्यांनीही स्वत:हून कर भरणा केला. त्यामुळे शंभर टक्के वसुली. या पैश्यातून गावात आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करण्यास मदत हाेणार आहे. - राज गुणाले, सरपंच, नागतीर्थवाडी.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :laturलातूर