शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBचा विराट कोहली जबाबदार! बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक सरकारचा अहवाल सादर
2
आरोपीच्या बोलावण्यावरून वारंवार हॉटेलमध्ये का गेलात? पती असताना परपुरुषाशी...! बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टानं फटकारलं
3
नॅशनल पार्कमधील ‘वनराणी’चे रुपडे पालटले; व्हिस्टाडोमसह नव्या अवतारात सेवेत, कधी सुरू होणार?
4
वृद्धाला हातपाय बांधून कारमध्ये कोंडले, मग कुटुंब ताजमहाल पाहण्यात रंगले, सुरक्षा रक्षकाने पाहिल्याने अनर्थ टळला   
5
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांना उच्च न्यायालयात चांगल्या पगारी नोकरी, २६ जुलैआधीच करा अर्ज!
6
"आमचं शांततापूर्ण जीवन..."; गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेने फोन चार्ज झाल्यावर पहिलं काय केलं?
7
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
8
प्रत्येक शेअरवर ५०,००० रुपयांचा फायदा; ना बोनस, ना स्टॉक स्प्लिट तरीही गुंतवणूकदार झाले मालामाल
9
Shravan 2025: शिवपुराणात दिलेल्या 'या' मंत्राने श्रावणात रोज जप केल्यास होते मनोकामनापूर्ती!
10
"दुसऱ्याच दिवशी वडील वारले, ठरलेलं लग्न मोडलं...", 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने सांगितली लाबुबू डॉलची भयानक स्टोरी
11
रॉबर्ट वाड्रांची ED कडून १८ तास चौकशी; चार्जशीटही दाखल, काय आहे प्रकरण? जाणून घ्या...
12
IT आणि बँकिंग शेअर्समध्ये मोठी पडझड; पण, टाटांच्या 'या' शेअर्ससह २ स्टॉक्सनी वाचवली इज्जत!
13
"शाकिबला मीच घरी आणलं पण पत्नीने त्याच्यासोबत..."; घरगुती वादातून तरुणाने स्वतःला संपवलं, व्हिडीओही काढला
14
“प्रताप सरनाईकांनी एकदा तरी शिवनेरीने प्रवास करावा”; बसची दुरवस्था, प्रवाशांचा संताप
15
मौलवींना बोलावून नाव बदललं, धर्मांतरण करण्यास भाग पाडलं; पीडित तरुणाचे पत्नीवर गंभीर आरोप!
16
"खूप मारलं, उपाशी ठेवलं, गोळ्या देऊन गर्भपात..."; सासरी अमानुष छळ, 'तिने' आयुष्य संपवलं
17
वडापाव, समोसा... आता वर्तमानपत्रात गुंडाळल्यास दुकान बंद? 'या' चुकीमुळे ७५ वर्षांची बेकरी झाली सील!
18
दहाव्यांदा बोनस शेअर देणार 'ही' मल्टीबॅगर कंपनी; १८ जुलै आहे रेकॉर्ड डेट, तुमच्याकडे आहे का?
19
डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार, तारीखही ठरली; पाक मीडियाचा मोठा दावा

उदगीर तालुक्यातील ८७ पैकी ४३ ग्रामपंचायतींवर महिलाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:22 IST

येथील राधाकृष्ण मंगल कार्यालयात बालक अथर्व देवप्रिय पवार याच्या हाताने चिठ्ठी काढून आरक्षण जाहीर करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी ...

येथील राधाकृष्ण मंगल कार्यालयात बालक अथर्व देवप्रिय पवार याच्या हाताने चिठ्ठी काढून आरक्षण जाहीर करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार रामेश्वर गोरे, नायब तहसीलदार संतोष गुट्टे, नायब तहसीलदार संतोष धाराशिवकर यांची उपस्थिती होती. यात सर्वसाधारण महिला १९, पुरूष २०, ना.म.प्र. महिला १२, पुरूष १२, अनुसूूचित जाती महिला ११, पुरूष ११, अनुसूचित जमाती महिला १ व पुरूष १ असे आरक्षण निघाले आहे.

सर्वसाधारण पुरूष : कुमठा खु., देऊळवाडी (मुत्तलगाव), करखेली, कल्लूर, किनी (यल्लादेवी), चांदेगाव, चोंडी, तादलापूर, तिवटग्याळ, दावणगाव, देवर्जन (हनमंतवाडी), निडेबन, बामणी, मलकापूर, मल्लापूर, मादलापूर, मोर्तळवाडी, शिरोळ, शेल्हाळ, हिप्परगा (डा.).

सर्वसाधारण महिला : करवंदी, कुमदाळ हेर, आरसनाळ, इस्मालपूर, जकनाळ, जानापूर, दिग्रस, तोंडचीर, धोंडिहिप्परगा, नेत्रगाव, बेलसकरगा, मोघा, रावणगाव, रूद्रवाडी, वाढवणा खु., सुकणी, सोमनाथपूर, हैबतपूर.

नागरिकांचा मागास प्रवर्गातील पुरुष : कासराळ, डाऊळ हि., धडकनाळ, नागलगाव (सोमला), लिंबगाव, वाढवणा बु., शंभु उमरगा (महादेववाडी), हंगरगा कु., हाळी (वंजारवाडी), गुरधाळ, नावंदी, हंडरगुळी.

अनुसूचित जमाती प्रवर्ग पुरुष : टाकळी वा. व महिलांसठी बोरगाव बु. या दोन गावांचे सरपंचपद आरक्षित झाले आहे.

ही आरक्षण प्रक्रिया पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार रामेश्वर गोरे, निवडणूक नायब तहसीलदार संतोष गुट्टे, नायब तहसीलदार संतोष धाराशिवकर, मंडळ अधिकारी शंकर जाधव, गणेश हिवरे, संतोष चव्हाण, तलाठी अमोल रामशेटे, पंकज कांबळे, अनिल मयाकलवार, देवप्रिय पवार, संतोष पाटील, अनंत चलमले आदींनी पुुढाकार घेतला.

तोगरी, नळगीर, शेकापूर महिलांसाठी आरक्षित...

नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला : उमरगा मन्ना (अनुपवाडी), तोगरी, नळगीर (मोर्तळवाडी), येणकी, शेकापूर, करडखेल, कौळखेड, क्षेत्रफळ, खेर्डा खु., गंगापूर, माळेवाडी, वागदरी.

अनुसूचित जाती प्रवर्ग पुरूष : अवलकोंडा, आडोळवाडी, एकुर्का रोड, कोदळी, गुडसूर, चिघळी, तोंडार, पिंपरी, बनशेळकी, मांजरी, सुमठाणा.

अनुसूचित जाती प्रवर्ग महिला : कुमदाळ उदगीर, चिमाचीवाडी, डांगेवाडी, डोंगरशेळकी, भाकसखेडा, लोणी, लोहारा, वायगाव, हकनकवाडी, हेर (बामाजीवाडी), होनिहिप्परगा.