जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा भारतबाई साळुंके, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, कृषी सभापती गोविंदराव चिलकुरे, समाजकल्याण सभापती रोहिदास वाघमारे यांच्यासह सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
प्रारंभी जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा त्यांनी आढावा घेतला. जिल्ह्यात एकूण ६७ हजार ८३९ कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. त्यापैकी उपचारानंतर ५२ हजार ४५१ जण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण १ हजार १८६ जण दगावले आहेत. आतापर्यंत एकूण ४ लाख २२ हजार ३५७ तपासण्या झाल्या आहेत.
डॉ. गंगाधर परगे यांचा सत्कार...
जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रावर कोविड लसीकरण मोहीम चांगल्या पद्धतीने राबविण्यात येत असल्याने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांचा अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी सत्कार केला. १२ नंबर पाटी येथील कोविड डेडिकेटेड हॉस्पिटलमध्ये जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे दर्जेदार सुविधा रुग्णांना पुरविण्यात येत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रातून कोविड लसीकरण मोहीम सुरू आहे. ती गावपातळीवर पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही अध्यक्ष राहुल केंद्रे म्हणाले.