शिरूर अनंतपाळ : शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी शिरूर अनंतपाळ - देवणी मार्गावरील तळेगाव (दे.) गावाजवळ १६ एकर जागेत उभारण्यात येत असलेल्या शिवलिंग शिवाचार्य प्रोड्यूसर कंपनीच्या सीएनजी, पीएनजी तसेच सेंद्रिय खतनिर्मिती प्रकल्पाच्या पायाभरणीचा कार्यक्रम गुरूवारी पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड. संभाजीराव पाटील होते. यावेळी प्रभाकरराव कुलकर्णी, एमसीएलचे रमेश पाटील, सुरेश बेद्रे, तहसीलदार अतुल जटाळे, पोलीस निरीक्षक कदम, महावितरणचे सहाय्यक अभियंता जोंधळे, कृषी अधिकारी नाबदे, ऋषिकेश बद्दे, चेअरमन दत्ता शिवणे, व्हा. चेअरमन ओमप्रकाश गलबले, उमाकांत पाटील, डॉ. अरविंद भातांब्रे, बालाजी येरमलवार, गणेश शिवणे, पंडित हत्तरगे, बसवराज शिवणे, डॉ. गोविंद चेवले, नंदकुमार शिवणे, गंगाधर चाकोते उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या उत्पादनात तिप्पट वाढ करून शेतकऱ्यांना उद्योजक बनविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या सेंद्रिय खतनिर्मिती प्रकल्प निर्मितीचे काम वर्षभरात पूर्ण करण्यात येणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या मुहुर्तावर कारखान्याचा गाळप हंगाम सुरू करण्याचा संकल्प संचालक मंडळाच्यावतीने करण्यात आला. प्रास्ताविक वीरभद्र बेंबळगे यांनी तर सूत्रसंचालन कुमार बंडे यांनी केले. उमाकांत पाटील यांनी आभार मानले. (वाणिज्य वार्ता)