शहर व तालुक्यातील कोरोनाच्या सद्यःस्थितीचा आढावा व उपाययोजनांबाबत येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात सोमवारी बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर, पंचायत समितीचे सभापती प्रा. शिवाजी मुळे, उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार रामेश्वर गोरे, मुख्याधिकारी भारत राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनियल बेन, राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष गजानन सताळकर, प्रा. श्याम डावळे, काँग्रेसचे मंजूरखाँ पठाण यांच्यासह वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणाले, कोरोनाबाधित रुग्णांना बरे होण्यास प्रोत्साहन द्यावे. रुग्णांसोबतच्या नातेवाइकांना राहण्यासाठी नगर परिषदेने पुढाकार घेऊन उपाययोजना करावी. उदगीर शहरात कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित पोलीस यंत्रणेस निर्देश दिले. दरम्यान, शासकीय रुग्णालय परिसरात उभारण्यात येत असलेल्या लिक्विड ऑक्सिजन टँकची पाहणीही राज्यमंत्री बनसोडे यांनी करून जलद गतीने काम करण्याच्या सूचना केल्या.