शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

उदगीरातील केवळ २५ टक्केच शेतकऱ्यांनी केली ई-पीक पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:24 IST

उदगीर : राज्य सरकारने या वर्षी ई-पीक पाहणी ॲप सुरू केले असून, महसूल विभाग आणि कृषी विभागाच्या वतीने हा ...

उदगीर : राज्य सरकारने या वर्षी ई-पीक पाहणी ॲप सुरू केले असून, महसूल विभाग आणि कृषी विभागाच्या वतीने हा संयुक्त प्रकल्प राबवण्यात येत आहे. माझी शेती, माझा सातबारा, माझा पीकपेरा या आधारावर राज्य सरकारने सुरू केलेल्या पीक पाहणीला १५ ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. उदगीर तालुक्यातील ६२ हजार ३३४ शेतकऱ्यांपैकी केवळ १५ हजार ७३२ शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी ॲपला प्रतिसाद दिला आहे. गावात तलाठी, मंडळ अधिकारी व कृषी साहाय्यक यांच्यामार्फत ॲपचा वापर करावा, यासाठी जनजागृती केली जात आहे.

ई-पीक पाहणी ॲपद्वारे पीकपेरा नोंदवण्यास सुरुवात होऊन एक महिन्याचा कालावधी होऊन गेला असला तरी केवळ २५ टक्के शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. शेतकऱ्यांमध्ये जागृती होण्यास लागणारा वेळ तसेच ऑनलाइन नोंदणीसाठी येणाऱ्या अडचणी पाहता सरकारने ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. सातबारा उताऱ्यावर ऑनलाइन पद्धतीने खरीप हंगामातील पिकाच्या नोंदणीला अवघे १५ दिवस शिल्लक राहिले आहेत. या राहिलेल्या काळात ७५ टक्के शेतकऱ्यांना नोंदणी करावी लागणार आहे. उदगीर तालुक्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी या कामासाठी थेट बांधावर शेतकऱ्यांचे प्रबोधन करत आहेत. येत्या १५ दिवसांच्या आता या ॲपद्वारे नोंदी न झाल्यास शासनाकडून नैसर्गिक आपत्ती योजनेतून मिळणाऱ्या आर्थिक मदतीला शेतकरी बांधवांना मुकावे लागणार आहे. तालुक्यात ६२ हजार ३३४ शेतकरी खातेदार आहेत. एक महिना उलटला तरी शेतकऱ्यांकडून या ई-पीक पाहणी ॲपला पाहिजे तसा प्रतिसाद नसल्याचे चित्र आहे. एका महिन्यात केवळ १५ हजार ७३२ शेतकऱ्यांनी ई-पीक नोंदणी केली आहे. त्यामुळे आता राहिलेल्या १५ दिवसांत ४६ हजार ६०० शेतकऱ्यांकडून नोंदणी करण्यासाठी महसूल व कृषी विभागाला गावोगावी जात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन या ई-पीक पाहणी ॲपची माहिती देत खरिपाची पीक नोंदणी करावी लागणार आहे.

डिजिटल प्रणाली शेतकऱ्यांच्या फायद्याची...

अतिवृष्टीमुळे तर कधी पाऊस न पडल्याने पिकांचे नुकसान होते आहे. अशा काळात शासनाला शेतकरी बांधवांना नुकसानभरपाई देताना अनेक अडचणी येतात. त्या वेळी पंचनामे करणे कठीण असते. पण या डिजिटल प्रणालीमुळे शेतकऱ्यांना मदत होणार आहे. तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी या ई-पीक पाहणी ॲपद्वारे नोंदणी मुदतीच्या आत करून घ्यावी.

- रामेश्वर गोरे, तहसीलदार

शेतकऱ्यांचा प्रतिसाद वाढविण्याची गरज...

ई-पीक पाहणी मोबाइल ॲपद्वारे करावी लागत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने जनजागृती केली जात आहे. ३० सप्टेंबर नोंदणीची अंतिम मुदत आहे. ॲपमध्ये पिकांची माहिती नोंदविल्यास नैसर्गिक आपत्तीची मदत वितरित करण्यात सुलभता येणार आहे. मात्र, अनेक शेतकऱ्यांकडे ॲण्ड्राइड मोबाइलची सुविधा नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे. यावर शासनाने तोडगा काढण्याची मागणी शेतकरी बांधवांमधून होत आहे.