शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

आनंदवाडी गाैर येथे शंभर टक्के लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:24 IST

गेल्या वर्षभरापासून कोरोनाचे संकट आहे. त्यापासून बचाव करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यात येत आहे. आनंदवाडी गौर ग्रामपंचायतीने गावातील नागरिकांसाठी ...

गेल्या वर्षभरापासून कोरोनाचे संकट आहे. त्यापासून बचाव करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यात येत आहे. आनंदवाडी गौर ग्रामपंचायतीने गावातील नागरिकांसाठी कोविड लसीकरण करण्यासाठी अथक परिश्रम घेतले असून, पहिल्या टप्प्यामध्ये लसीकरण केंद्रावर जाण्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत मोफत वाहनाची सुविधा पुरविण्यात आली होती.

मसलगा आरोग्य उपकेंद्राच्या डॉ. अश्विनी शिंदे यांच्यासह आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत गावामध्ये लसीकरणासाठी कॅम्प ठेवत दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यांमध्ये लसीकरण करण्यावर भर देण्यात आला. अंध, अपंग, अनेक वर्षांपासून आजारी असलेल्यांना लस घेण्यासाठी जाणे शक्य नसल्याने अशांसाठी घरी जाऊन ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, सदस्य व आरोग्य विभागाने त्यांच्या घरी जाऊन गावातील शंभर टक्के लसीकरण पूर्ण करण्यासाठी परिश्रम घेतले. वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाळ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मसलगा आरोग्य उपकेंद्राच्या डॉ. अश्विनी शिंदे, आरोग्य सेविका यु. एम. कमले, आरोग्य पर्यवेक्षक गणेश कांबळे, सविता जाधव, सचिन शिंदे, आशा कार्यकर्ती मनीषा तंगडपल्ले, अंगणवाडी मदतनीस माया चौरे, सरपंच वर्षा विष्णू चामे, उपसरपंच विमल ज्योतिराम नागमोडे, ग्रामसेविका सदस्य सगुणा, राधिका चामे, वनीता चवरे, शालूबाई चामे, तंटामुक्त समिती अध्यक्ष आयोध्या चामे, माजी सरपंच भाग्यश्री ज्ञानोबा चामे, विष्णू चामे, राम चवरे आदींनी परिश्रम घेतले. गेल्या अनेक वर्षांपासून गावामध्ये माजी सरपंच भाग्यश्री ज्ञानोबा चामे यांनी विविध उपक्रम राबवून गावाचे नावलौकिक केले आहे. तीच परंपरा पुढे आपण सुरू ठेवत गावामध्ये विविध उपक्रम सध्या राबवत असल्याचे सरपंच वर्षा विष्णू चामे यांनी सांगितले.

लसीकरणासाठी इतर गावांनी पुढे यावे...

कोविड आजाराचे सुरक्षा कवच म्हणून कोविड लसीकरण करणे गरजेचे आहे. प्रशासन कुठल्याही मदतीसाठी तत्पर असून तालुक्यातील इतर गावांमध्ये शंभर टक्के लसीकरण पूर्ण करण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन गटविकास अधिकारी अमोल ताकभाते यांनी केले आहे.

आरोग्य विभागाला मिळाले सहकार्य...

आनंदवाडी या गावाने १०० टक्के लसीकरण पूर्ण केले असून, यासाठी आरोग्य विभागाला ग्रामस्थ, ग्रामपंचायतचे सहकार्य मिळाले. तालुक्यातील इतरही गावे १७ सप्टेंबरपर्यंत प्राप्त अहवालानुसार जाहीर करण्यात येणार असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीपकुमार जाधव यांनी सांगितले.