पहिल्या टप्प्यात ४६ टक्के लसीकरण
पहिल्या टप्प्यात शासकीय व खाजगी आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येत आहे. २२ हजार १३४ जणांना लस देण्याचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी १० हजार ८१ जणांना लस देण्यात आली आहे. ४६ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. १२ हजार ५५ जणांना लस देण्याची प्रक्रिया सुरू आहे. राज्यात लसीकरणामध्ये आपला जिल्हा सोळाव्या क्रमांकावर असून, प्रथम क्रमांकावर भंडारा, पालघर हे दोन जिल्हे आहेत. तर आपल्या मागे बुलढाणा, सांगली, औरंगाबाद जिल्हा आहे.
महसूल व पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांनाही लस
कोरोनाच्या कामात असलेल्या महसूल विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना तसेच पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांची लस देण्यासाठी नोंदणी झाली असून, त्यांनाही लस दिली जात असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली. केंद्र शासनाने दिलेल्या पोर्टलवर नोंदणी झाल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यास लस घेण्याबाबत संदेश जातो. दिलेल्या तारीख व वेळेत संबंधितांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.