शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

निलंगा तालुक्यात पुन्हा भूगर्भातून आवाज; जमीन हादरल्याने नागरिकांत भीती

By हरी मोकाशे | Updated: September 8, 2022 17:26 IST

. भूकंपाचे धक्के असण्याच्या भीतीने नागरिक घराबाहेर पडले होते.

निलंगा (जि. लातूर) : तालुक्यातील हासोरी बु. गावात गुरुवारी दुपारी २.१२ वा.च्या सुमारास पुन्हा भूगर्भातून अचानक मोठा आवाज झाला. त्यामुळे नागरिक काही क्षणातच घराबाहेर येत सुरक्षित स्थळी जाण्यासाठी सर्वांची धावपळ उडाली होती.

तालुक्यातील हासोरी बु. येथे दोन दिवसांपूर्वी म्हणजे मंगळवारी रात्री १०.१२ वा. च्या सुमारास भूगर्भातून अचानक आवाज येऊन जमीन हादरली होती. भूकंपाचे धक्के असण्याच्या भीतीने नागरिक घराबाहेर पडले होते. दरम्यान, हा भूगर्भातून आवाज झाला असून भूकंप नसल्याची माहिती तालुका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली होती.गुरुवारी दुपारी नेहमीप्रमाणे नागरिक आपली कामे करीत होती. दरम्यान, २.१२ वा. च्या सुमारास पुन्हा भूगर्भातून आवाज येत जमीन हादरली. तसेच घरातील भांडीही हादरली. त्यामुळे नागरिकांनी खुल्या सुरक्षित जागेत धाव घेतल्याचे गावातील नागरिकांनी सांगितले. दरम्यान, प्रभारी तहसीलदार सुरेश घोळवे म्हणाले, हा गुढ आवाज आहे. भूकंपाचे धक्के असते तर परिसरातील गावांतील जमीन हादरली असती. त्यामुळे नागरिकांनी घाबरु नये, असे आवाहन केले आहे.

भूकंप नाही...हासोरी बु. गावात जमीन हादरल्याची माहिती मिळाली असून तो भूकंप नाही. भूकंपाची आपोआप भूकंप मापन केंद्रावर नोंद होते, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी साकेब उस्मानी यांनी सांगितले.

 

टॅग्स :laturलातूर