उदगीर : लोकशाही प्रक्रियेत मतदान अधिक होणे हे सजगतेचे लक्षण आहे. त्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी केले.
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त येथील तहसील कार्यालयाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी नायब तहसीलदार संतोष गुट्टे, धनंजय गुडसूरकर, अनिता येलमटे उपस्थित होते. यावेळी नायब तहसीलदार संतोष गुट्टे, एस. एस. शेख, राजकुमार कपाळे, जी. एम. पचंडे, ओंकार मनदुमले, सय्यद रजियोद्दीन हाश्मी, डी. जी. बोभे, वर्षा राठोड, दीपक महालिंगे, भास्कर जाधव, संजय डुकरे, वसंत मुंढे, संतोष आचारे, संगीता मळभागे, एस. सी. खेडे, व्ही. पी. गुरमे, डी. बी. नकुरे हे मतदानस्तरीय केंद्र अधिकारी व पर्यवेक्षक शिवशंकर पाटील यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन दगडू केंद्रे यांनी केले.