केंद्र सरकारकडून बॅकांचे खाजगीकरण करण्याच्या हालचाली सुरु आहेत. याबाबतचा निर्णय देशाच्या अर्थमंत्र्यंनी जाहीर केला आहे. सध्याला आयडीबीआय आणि दोन सार्वजनिक क्षेत्रातील बँकेचे खाजगीकरणाची घोषणा करण्यात आली आहे. या धाेरणाविराेधात देशव्यापी बँकांचा बंद पुकारण्यात आल आहे. हा बंद साेमवार आणि मंगळवारी राहणार आहे. या बंदला चाकूर शहरासह तालुक्यात १०० टक्के प्रतिसाद मिळाला आहे. परिणामी, आर्थिक व्यवहार ठप्प झाले हाेते. चाकूर शहरासह तालुक्यातील चापोली, नळेगाव, वडवळ (नागनाथ), झरी (खु.) येथील बँकाचे व्यवहार बंद ठेवण्यात आले. येथील कर्मचाऱ्यांनी केंद्र सरकारच्या धाेरणांचा, निर्णयाचा निषेध नाेंदविला. शनिवार, रविवार सलग दाेन दिवस बॅकांना सुटी हाेती. साेमवारीही बॅकांनी देशव्यापी बंद पुकारल्याने, व्यापारी वर्गावसह दैनंदिन आर्थिक व्यवसाहारावर माेठा परिणाम झाला. दिवसभरात लाखाे रुपयांची उलाढाल ठप्प झाली.
चाकूर येथे देशव्यापी बंदला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:20 IST