यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुचिता शिंदे, प्रभारी तहसीलदार राजेश जाधव, नायब तहसीलदार हरिश काळे आदींची उपस्थिती होती. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल म्हणाले, लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी नवमतदारांनी जास्तीत जास्त नावनोंदणी करून मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवावा. लोकशाहीत संविधानाने दिलेल्या अधिकाराचा सन्मान करून मतदारांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावावा, असेही ते म्हणाले. यावेळी शैक्षिणक संस्था तसेच वादविवाद, चित्रकला, निबंध, वक्तृत्व स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या विजेत्यांचा प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच उत्कृष्ट काम केलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचाही सत्कार झाला. डीएलओ, डाटा एन्ट्री ऑपरेटर, नोडल ऑफिसर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
राष्ट्रीय मतदार दिवस उत्साहात साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:26 IST