शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
2
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
3
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
4
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
5
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
6
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
7
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
8
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
9
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
10
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
11
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
12
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
13
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
14
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
15
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
16
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
17
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
18
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
19
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
20
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!

शिरुर ताजबंद येथे राष्ट्रीय पोषण आहार प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:22 IST

गरोदर माता, स्तनदा माता, किशोरवयीन मुली, ० ते ६ वर्षे वयोगटातील बालकांचे आरोग्य सुदृढ राहावे व कुपोषणाचे प्रमाण कमी ...

गरोदर माता, स्तनदा माता, किशोरवयीन मुली, ० ते ६ वर्षे वयोगटातील बालकांचे आरोग्य सुदृढ राहावे व कुपोषणाचे प्रमाण कमी व्हावे यासाठी आहाराचे, कडधान्य व भाज्यांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी उपसरपंच प्रताप पाटील होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून समाजकल्याण सभापती रोहिदास वाघमारे, महिला व बालकल्याण सभापती ज्योती राठोड, कृषी सभापती गोविंद चिलकुरे, पोलीसपाटील उत्तमराव वाघमारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी देवदत्त गिरी, बालविकास प्रकल्प अधिकारी शोभा घोडके उपस्थित होते.

याप्रसंगी मुलगी जन्माचे स्वागत, दोनच मुली असलेल्या माता-पित्यांचे अभिनंदन, गरोदर मातेची वटभरणी यासारख्या कार्यक्रमाच्या आयोजनाने सभागृहात कौटुंबिक आणि भावनिक वातावरण निर्माण झाले होते. शोभा घोडके यांनी प्रास्ताविक केले. धम्मपाल सरोदे यांनी सूत्रसंचालन केले, तर ग्रामविकास अधिकारी उत्तम भदाडे यांनी आभार मानले.

यशस्वितेसाठी आशा मोरे, सुनीता महाके, श्रीदेवी कांबळे, शोभा हाके, सुशील शिंदे, वर्षा बलशेटवार, प्रियंका शिवनखेडे, आशा कथमवाड, सुनीता डुरे यांच्यासह अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनीस, ग्रामपंचायत सदस्य रणधीर पाटील, विक्रम भोसले, राहुल वाघमारे, गजेंद्र वलसे, जयंत सगर, सुनंदा वलसे, उषा वाघमारे, राजे ताई यांनी परिश्रम घेतले.