शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

नायब तहसीलदारांचे काम बंद आंदोलन; राजपत्रित वर्ग-२ संवर्गाच्या 'ग्रेड पे'च्या वाढीची मागणी

By हणमंत गायकवाड | Updated: April 3, 2023 18:19 IST

नायब तहसीलदार राजपत्रित वर्ग-२ यांचा ग्रेड पे ४८०० रुपये मंजूर करण्यात यावा, यासाठी १९९८ पासून वारंवार पाठपुरावा करण्यात येत आहे.

लातूर : नायब तहसीलदार राजपत्रित वर्ग-२ हे अत्यंत महत्वाचे पद असून, या पदाचे वेतन राजपत्रित वर्ग-२ चे नसल्याने नायब तहसीलदारांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. सोमवारपासून या आंदोलनाला प्रारंभ झाला असून, तहसीलदारांनीही नायब तहसीलदारांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. 

नायब तहसीलदार राजपत्रित वर्ग-२ यांचा ग्रेड पे ४८०० रुपये मंजूर करण्यात यावा, यासाठी १९९८ पासून वारंवार पाठपुरावा करण्यात येत आहे. परंतु, शासनाचे त्याकडे दुर्लक्ष आहे. शासनाकडून दखल घेतली जात नाही. अपर मुख्य सचिवांच्या बैठकीत महसूलमंत्री व वित्त मंत्र्यांच्या उपस्थितीत प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन निघाले होते. परंतु, शासनाने याकडे दुर्लक्ष केलेले आहे. 

लातूर येथे सुरू असलेल्या आंदोलनामध्ये तहसीलदार स्वप्नील पवार, भारत सूर्यवंशी, सुरेश घोळवे, धम्मप्रिया गायकवाड, रामेश्वर गोरे, प्रसाद कुलकर्णी, महेश परांडेकर, महेश सावंत, शोभा पुजारी, नायब तहसीलदार राजेश जाधव, कुलदीप देशमुख, भीमाशंकर बेरुळे, प्रभू जाधव, सुधीर बिराजदार, लालासाहेब कांबळे, प्रवीण आळंदकर, सुरेश पाटील, शिवमूर्ती बनसोडे, हरिश काळे, परवीन पठाण, धनश्री स्वामी आदींसह विविध तहसील कार्यालयांतील नायब तहसीलदार आंदोलनात सहभागी होते.

बेमुदत काम बंद आंदोलन नायब तहसीलदार राजपत्रित वर्ग यांचे ग्रेड पे ४८०० करण्याची न्याय मागणी आहे. या अनुषंगाने त्रुटी समितीची बैठकही झाली होती. कामाचे स्वरूप, जबाबदारी इत्यादी सर्व माहिती असूनही ते लागू केला जात नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्या वतीने बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. 

 

टॅग्स :laturलातूरRevenue Departmentमहसूल विभाग