शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणचे विद्युत पोल रस्त्यावर; वाहनधारकांची गैरसोय !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:24 IST

उदगीर : येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते देगलूर रोडवरील अप्पाराव चौकापर्यंत महावितरणचे विद्युत पोल व डीपी रस्त्याच्या मधोमध ...

उदगीर : येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते देगलूर रोडवरील अप्पाराव चौकापर्यंत महावितरणचे विद्युत पोल व डीपी रस्त्याच्या मधोमध मागील दोन वर्षापासून आहे त्या स्थितीतच आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महावितरणच्या वादात असलेले हे पोल आता महावितरणने बाजूला करण्याचे ठरवलेले असून, ठेकेदार या कामाकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून, अपघाताचा धोका वाढला आहे.

उदगीर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते देगलूर रोड वरील गाव चौकापर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे सिमेंट रस्त्याचे काम करण्यात आले. या रस्त्यावर काही ठिकाणी उच्च दाबाचे पोल व डीपी तसेच ठेवून रस्ता रुंदीकरण करण्यात आले. या काळात महावितरणने सार्वजनिक बांधकाम खात्यावर शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देऊन गुन्हा नोंद करण्याबाबत पोलिसांना कळवले होते. परंतु पोलिसांनी दोन्ही विभागांना यावर तोडगा काढण्यात यावा म्हणून गुन्हा नोंद केलेला नव्हता. शहराचा विस्तार वाढत असल्याने या मार्गावरून होणारी वाहतूक मोठ्या प्रमाणावर आहे. देगलूर, जळकोट, निजामाबाद तसेच तहसील कार्यालय औद्योगिक शिक्षण संस्था, देगलूर रोड येथे स्थलांतरीत झाल्याने या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. तसेच या रस्त्यावर अनेक रुग्णालय तसेच लाईफ केअर हॉस्पिटलला जाण्यासाठी हा रस्ता सोयीचा आहे. नवीन सिमेंट रस्ता झाला. परंतु, चौकात विद्युत वितरण कंपनीचे पोल रस्त्याच्या मधोमध असल्याने रस्ता रुंदीकरण होऊनसुद्धा वाहनधारकांना स्वतःचा जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

विद्युत तारा खाली असल्याने अपघाताचा धोका...

रस्त्यावर काही ठिकाणी या पोल वरून विद्युत तारा खाली असल्याने धोका होण्याची शक्यता वाढलेली आहे. याबाबत प्रशासनाने वेळीच लक्ष घालून देगलूर रोड वरील किमान ५० पेक्षा जास्त विद्युत पोल तसेच उच्च विद्युत वाहिनीचे पोल व जमीनीलगत झालेल्या डीपी रस्त्याच्या कडेला करून नागरिकांना या भागातून वाहतूक करताना होणाऱ्या त्रासातून मुक्तता द्यावी, अशी मागणी नागरिकांतून व्यक्त होत आहे.