मार्चमध्ये लॉकडाऊन झाल्यानंतर तीन- चार महिने मीटर रीडिंग न घेता अंदाजे वीज बिले देण्यात आली. दरम्यान, वीजबिल सवलत मिळेल, असे आश्वासन देण्यात आले. त्यामुळे बहुतांश ग्राहकांनी बिल भरले नाही. मात्र, थकबाकी वाढत असल्याने महावितरणच्या वतीने आता वसुली मोहीम राबविण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहक हैराण झाले आहेत.
बेलकुंड वीज उपकेंद्र अंतर्गतच्या बेलकुंड येथील १४३ ग्राहकांकडे ७ लाख २ हजार, चिंचोली (सोन)- ५१ ग्राहकांकडे २ लाख ५ हजार, देवताळा- २७ ग्राहकांकडे ६९ हजार, गुळखेडा- १४३ ग्राहकांकडे ४ लाख ८१ हजार, हिप्परगा- १२० ग्राहकांकडे ३ लाख ८५ हजार, कवळी- ४१ ग्राहकांकडे १ लाख ३० हजार, लोहटा- ४२ ग्राहकांकडे १ लाख १० हजार, माळुंब्रा- २६ ग्राहकांकडे ३ लाख १२ हजार, माळकोंडजी- १२४ ग्राहकांकडे ४ लाख ८० हजार, मनोहर तांडा २३ ग्राहकांकडे ५७ हजार, मातोळा- २३० ग्राहकांकडे ९ लाख ३३ हजार, शिंदाळा (लो.) - ८८ ग्राहकांकडे ३ लाख ५२ हजार, शिंदाळावाडी ४७ ग्राहकांकडे १ लाख ४५ हजार, टेंंबी १२ ग्राहकांकडे ४५ हजार, येलोरीवाडी १४० ग्राहकांकडे ४ लाख २५ हजार अशी एकूण १ हजार २५७ ग्राहकांकडे ४८ लाख ३० हजार थकबाकी आहे.
ग्राहकांनी वीजबिल भरावे...
बेलकुंड वीज उपकेंद्रअंतर्गतच्या १५ गावांमधील ग्राहकांकडे थकबाकी वाढली आहे. ग्राहकांनी लवकर वीजबिल भरावे. त्याचबरोबर वीजबिलात काही त्रुटी असल्यास दुरुस्त करून घ्यावे. बिल न भरल्यास महावितरणच्या वतीने करवाई केली जाईल.
- अमित शृंगारे, सहाय्यक अभियंता, महावितरण.