शिवराज आंधळे यांच्या कुटुंबास मदत
लातूर : विनोबा भावे आश्रमशाळेतील प्रा.शिवराज आंधळे यांच्या कुटुंबीयास आश्रमशाळा कर्मचाऱ्यांच्या वतीने ५५ हजार रुपयांची मदत करण्यात आली. यावेळी प्राचार्य शिवशंकर ढेले, आश्रमशाळा संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष पृथ्वीराज पाटील, राजकुमार वाघमारे, दिनकर पासमे, अनिल चोले, विवेकानंद बुजारे, राजपाल काळे, प्रदीप फड, मुख्याध्यापिका सुनीता नागिमे, एस.सी. गोजमगुंडे, के.एन. गौड, अशोक गुळवे, कल्पना रोंगे आदींची उपस्थिती होती.
आधार फाउंडेशनच्या वतीने जनजागृती मोहीम
लातूर : शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, धनेगाव येथील आधार फाउंडेशनच्या वतीने ऑनलाइन पद्धतीने जनजागृती केली जात आहे. मास्क, सॅनिटायझर, फिजिकल डिस्टन्स आदी उपाययोजनांची माहिती दिली जात आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. नियमांचे पालन करावे, असे आवाहनही आधार फाउंडेशनच्या वतीने केले जात आहे. दरम्यान, स्वयंसेवक उत्स्फूर्तपणे जनजागृती मोहीम राबवित आहेत.
ग्रामीण भागात निर्जंतुकीकरण मोहीम
लातूर : ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या वतीने निर्जंतुकीकरण फवारणी मोहीम राबविली जात आहे, तसेच गावातील नागरिकांना मास्क, सॅनिटायझरचे मोफत वाटप केले जात आहे. सर्दी, ताप, खोकला आदी लक्षणे दिसताच, आरोग्य तपासणी करून घेण्याचा सल्ला ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने दिला जात आहे. यासाठी सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं. सदस्य, ग्रामसेवक, तलाठी आदी परिश्रम घेत आहेत.