साकोळ येथील अश्विनी सूर्यवंशी ही युवती लातूर येथे एलएल.बी.चे शिक्षण घेत होती. तिचा लातुरात संशयास्पद मृत्यू झाला. या प्रकरणाची पाेलीस प्रशासनाने सखाेल चाैकशी करावी, यातील दाेषींना कडे शासन करावे, अशी मागणी समाजबांधवांकडून हाेत आहे. गावातील दाेन मुले अश्विनीला त्रास देत असल्याचे तिच्या कुटुंबीयांनी सांगितले. या प्रकरणाची सखाेल चाैकशी करावी, अशी मागणी ब्ल्यू पँथर संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष साधू गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पालकमंत्री अमित देशमुख यांच्या बाभळगाव येथील निवासस्थानासमाेर आंदाेलन करण्यात आले.
यावेळी किरण गायकवाड, दिलीप नवगिरे, आबासाहेब गायकवाड, रामदास सोनवणे, सिद्धार्थ सूर्यवंशी, शेखर कांबळे, नीलेश कांबळे, राजू कांबळे, प्रशांत कांबळे, शिवा कांबळे यांची प्रमुख उपस्थिती हाेती.