झाले असल्याची माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांची यांनी दिली. विशेष म्हणजे, शेत, पाणंद रस्त्यासाठी सर्वाधिक निधी जळकोट, उदगीरला मंजूर करण्यात आला आहे.
राज्य शासनाच्या वतीने प्रत्येक गावात पाणंद रस्ते व्हावेत तसेच पाणंद मुक्त व्हावी, म्हणून पालकमंत्री पाणंदमुक्त रस्ते योजना सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. त्यातून माती काम केले जाते. या योजनेअंतर्गत जळकोट तालुक्यासाठी १ कोटी रुपये तर उदगीर तालुक्यासाठी ४ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. एक कोटी रुपयांतून जळकोट तालुक्यातील वाडी- तांडे व इतर गावांचे पाणंद रस्ते करण्यास मदत होणार आहे. तसेच शेतकऱ्यांना शेतीकडे ये- जा करण्यासाठी पाणंद रस्ते होणार असल्याने अडचण दूर होणार आहे. त्याचबरोबर इतर गावांना जाण्यासाठी छोटे- मोठे रस्तेही या योजनेतून पूर्ण होणार आहेत. याबाबत तहसीलदार, गटविकास अधिका-यांनाही सूचना देण्यात आल्या असून त्या गावचे तलाठी, ग्रामसेवक, सरपंच व कार्यकर्त्यांनी आपापल्या गावातील पाणंद रस्त्यांचे काम सुचवावे, असे आवाहनही राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले आहे.
हा निधी मंजूर झाल्याने राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अर्जुन पाटील आगलावे, बाजार समितीचे माजी सभापती मन्मथप्पा किडे, काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष मारुती पांडे, नगरपंचायतीचे गटनेते महेश धुळशेटे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सत्यवान पाटील दळवे, जिल्हा उपाध्यक्ष संग्राम पाटील हसुळे, विठ्ठल चव्हाण, गजानन दळवे, जिल्हा उपाध्यक्ष गोविंद भ्रमण्णा, शहराध्यक्ष अशोक डांगे, धनंजय भ्रमण्णा, दस्तगीर शेख, पाशाभाई शेख, सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष महेताब बेग, मुमताज शेख, आकाश वाघमारे, नितीन धुळशेटे यांनी आनंद व्यक्त केला.