जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था मुरुड यांच्या वतीने आयोजित मिशन शिष्यवृत्ती शिबिरातील सुलभकांचा सन्मान सोहळा व दिव्य प्रतिभा वक्तृत्व स्पर्धा बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य अनिल मुरकुटे, डाॅ. राजेंद्र गिरी, विजयकुमार सायगुंडे, संतोष ठाकूर, सिद्धेश्वर कांबळे,डॉ. भागिरथी गिरी, रोटरी क्लबचे डॉ. हरिप्रसाद सोमाणी, संजय बोरा, उमाकांत मद्रेवार, ॲड. नंदकिशोर लोया, पुरुषोत्तम नोगजा, हेमंत रामढवे यांची उपस्थिती होती. यावेळी प्राचार्य अनिल मुरकुटे म्हणाले, मिशन शिष्यवृत्ती शिबिरातील सुलभकांच्या मेहनतीमुळेच आम्ही हा उपक्रम यशस्वीपणे राबवू शकलो. शहरी भागातील विद्यार्थ्यांबरोबर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही याचा लाभ झालेला आहे व होत आहे. सुलभकांच्या वतीने जगदेवी खानापूरे, रामकिशन सुरवसे, प्रमोद हुडगे, शिवशंकर राऊत यांनी विचार मांडले. शिबिराच्या यशस्वितेसाठी मारोती कदम, सतिश सातपुते, सतिश भापकर,,रमेश माने, सुनिलकुमार राजूरे, स्मीता मामिलवाड, अय्युब शेख, नागेश लोहारे, विकास चव्हाण, निशिकांत मिरकले आदींनी परिश्रम घेतले.
ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांना फायदा...
या उपक्रमामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांना फायदा हाेणार आहे. या उपक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून शिवशंकर राऊत, प्रमोद हुडगे, गणेश कलशेट्टी, जगदेवी खानापूरे, बाबासाहेब इंगळे, उत्तम शिंदे, अजितकुमार शिरुरे, मंजुषा कोकणे, शिवराज स्वामी, वैशाली गोकुळे, विनायक साखरे, मुरलीधर शिंदे, गणपत जाधव, अशोक गायकवाड, रामकिशन सुरवसे, प्रमोद कटके, रमेश शेंडगे यांनी काम पाहिले.
सुलभकांचा सन्मान सोहळा...
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था मुरुड यांच्या वतीने मिशन शिष्यवृत्ती शिबिरातील सुलभकांचा सन्मान सोहळा व दिव्य प्रतिभा वक्तृत्व स्पर्धा बक्षीस वितरण सीईओ अभिनव गोयल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्राचार्य अनिल मुरकुटे, डाॅ. राजेंद्र गिरी, विजयकुमार सायगुंडे, संतोष ठाकूर, सिद्धेश्वर कांबळे, डॉ. भागिरथी गिरी, रोटरी क्लबचे डॉ. हरिप्रसाद सोमाणी, संजय बोरा, उमाकांत मद्रेवार, ॲड. नंदकिशोर लोया, पुरुषोत्तम नोगजा, हेमंत रामढवे.