शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

एमआयएम स्वबळावर लढणार

By admin | Updated: March 6, 2017 00:48 IST

लातूर : वादग्रस्त विधान करून खळबळ उडवून देणारे ‘एमआयएम’चे राष्ट्रीय अध्यक्ष खा. असदोद्दीन ओवेसी यांची मनपा निवडणुकीच्या अनुषंगाने लातुरात मंगळवारी जाहीर सभा होणार आहे.

लातूर : वादग्रस्त विधान करून खळबळ उडवून देणारे ‘एमआयएम’चे राष्ट्रीय अध्यक्ष खा. असदोद्दीन ओवेसी यांची मनपा निवडणुकीच्या अनुषंगाने लातुरात मंगळवारी जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे या सभेकडे लातूरचे लक्ष लागले असून, राजकीय वर्तुळातही सभेची चर्चा सुरू आहे. एमआयएमने औरंगाबाद, नांदेड महापालिका तसेच बीड आणि लातूर जिल्ह्यातील उदगीर नगरपालिकेत चांगले यश मिळविले आहे. देवणी, जळकोट आणि चाकूर नगरपंचायतीत एमआयएमचा प्रत्येकी एक सदस्य निवडून आला आहे. आता लातूर मनपात परिवर्तन आघाडी करून एमआयएमने स्वबळावर निवडणुका लढविण्याचा निर्धार केला आहे. उदगीर नगरपालिकेत एमआयएमचे सहा सदस्य निवडून आले असून, आता लातूर मनपात यश मिळविण्यासाठी पक्षाच्या वतीने कंबर कसली आहे. त्यानुषंगाने मंगळवारी लातुरात होत असलेल्या जाहीर सभेत खा. असदोद्दीन ओवेसी काय बोलतात, याकडे लक्ष लागले आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत एमआयएमला यश मिळाले नसले, त्यांच्या उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात मते घेतली आहेत. दोन-तीन ठिकाणी दुसऱ्या स्थानाची तर काही ठिकाणी तिसऱ्या क्रमांकाची मते एमआयएमला मिळाली आहेत. उदगीर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारालाही तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत. नगरपंचायती आणि उदगीर नगरपालिकेत तर चांगले यश मिळाले आहे. त्यामुळे लातूरच्या सभेत खा. ओवेसी समाजाची व्होट बँक वळविण्यासाठी काय जादू करतात, याकडे लक्ष लागले आहे. महाराष्ट्र विकास आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. अण्णाराव पाटील यांची एमआयएमसोबत आघाडी आहे. त्यांच्याच अध्यक्षतेखाली खा. ओवेसी यांची सभा मंगळवारी सायंकाळी ६ वाजता डॉ. आंबेडकर पार्क येथे होणार आहे. सभेची जय्यत तयारी करण्यात आली असून, आ. इम्तियाज जलील, आ. वारिस पठाण, डॉ. सुभाष माने, प्रा.डॉ. सुरेश वाघमारे, बसवंतअप्पा उबाळे, ताहेर शेख यांचीही उपस्थिती राहणार आहे. (प्रतिनिधी)