हाळी ग्रामपंचायतीची सदस्य संख्या १५ असून, सरपंचपद ओबीसी पुरुष प्रवर्गासाठी आरक्षित होते. या निवडणुकीत कल्याण पाटील यांच्या पॅनलला ९ तर शिवाजीराव माने यांच्या पॅनलला ६ जागा मिळाल्या. गुरुवारी सरपंच, उपसरपंचांची निवड करण्यात आली.
कल्याण पाटील यांच्या गटाकडून सरपंचपदासाठी माया गायकवाड तर शिवाजीराव माने यांच्या गटातून उपेंद्र काळेगोरे यांनी नामनिर्देशन दाखल केले. उपसरपंचपदासाठी राजकुमार पाटील व सिद्धार्थ मसुरे यांनी अर्ज भरले. यात माया गायकवाड यांना ९ तर उपेंद्र काळेगोरे यांना ६ मते मिळाली. उपसरपंचपदासाठीच्या राजकुमार पाटील यांना ९ व सिद्धार्थ मसुरे यांना ६ मते मिळाली. त्यामुळे सरपंच म्हणून माया गायकवाड तर उपसरपंच म्हणून राजकुमार पाटील यांची निवड झाली.
निवडणूक निर्णय अधिकारीमम्हणून एस.के. चव्हाण यांनी काम पाहिले. यावेळी ग्रामविकास अधिकारी मनोहर जानतिने, तलाठी मीना आलापुरे यांची उपस्थिती होती. नूतन पदाधिका-यांचे स्वागत काॅंग्रेसचे तालुकाध्यक्ष कल्याण पाटील, चेअरमन अशोकराव माने, माजी सरपंच माधव माने, सतीश काळे, आलिम तांबोळी, दगडू माने, मुनाफ टप्पेवाले, सचिन माने, गौतम कांबळे आदींनी केले.