शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

मांजरा धरण ५० टक्के भरले; अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा !

By हणमंत गायकवाड | Updated: September 20, 2022 16:03 IST

पूर्ण क्षमतेने पाणी पातळी होण्यासाठी प्रकल्प क्षेत्रात मोठा पाऊस पडणे आवश्यक आहे. 

लातूर : लातूर शहरासह केज, धारूर, अंबाजोगाई, कळंब आदी प्रमुख गावांना पाणी पुरवठा करणारा मांजरा प्रकल्प ५० टक्के भरला असून, ८८.५२५ दलघमी जिवंत पाणीसाठा झाला आहे. यंदाच्या पावसाळ्यात प्रकल्पात ४१.२३८ दलघमीची आवक झाली आहे. दरम्यान, प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी मोठ्या पावसाची गरज आहे. 

मांजरा धरणाच्यावर अप्पर प्रकल्प आहे. हा प्रकल्पही भरलेला नाही. त्यामुळे मांजरा प्रकल्प अद्याप भरलेला नाही. प्रकल्प क्षेत्रात आतापर्यंत ५१३.५० मि.मी. पाऊस झाला असला तरी धरणात आतापर्यंत ४१.२३८ दलघमी नवीन पाणी आलेले आहे. धरणात एकूण ८८.५२५ दलघमी जिवंत पाणीसाठा आहे. धरणाच्या पाणी पातळीची क्षमता ६४२.३७ मि.मी. आहे. मात्र सध्याची पाण्याची पातळी ६३९.८० मीटर आहे. पूर्ण क्षमतेने पाणी पातळी होण्यासाठी प्रकल्प क्षेत्रात मोठा पाऊस पडणे आवश्यक आहे. 

गेल्या २४ तासामध्ये प्रकल्प क्षेत्रात १२.५० मि.मी. पाऊस झाला आहे. त्यातून १.०९६ दलघमी पाण्याची आवक झालेली आहे. ही आवक गेल्या २४ तासांतील आहे. धरणात सध्या जिवंत साठा ८८.५२५ दलघमी आहे. पण जिवंत पाणीसाठ्याची क्षमता १७६.९६३ दलघमी आहे. ही क्षमता गाठण्यासाठी प्रकल्प क्षेत्रात पाऊस होणे गरजेचे असल्याचे शाखाधिकारी सूरज निकम यांनी सांगितले.

 

टॅग्स :laturलातूरManjara Damमांजरा धरण