चाकूर तालुक्यातील ७१ ग्रामपंचायती असून, सध्याला ५० ग्रामसेवक ७१ ग्रामपंचायतीचा कारभार सांभाळत आहेत. ग्रामसेवकांची अनेक पदे रिक्त असल्याने इतर ग्रामसेवकांच्या खांद्येवर अतिरिक्त कारभाराचा भार आहे. अजनसोंडा (खु.) येथील ग्रामसेवक धीरज अलमले यांच्याकडे शिरनाळचा अतिरिक्त भार आहे. पंचायत समितीत नरसिंग आदुले हे सध्याला कार्यरत आहेत. तर झरी (खु.) येथील ग्रामसेवक दिलीप बालकुदे यांच्याकडे केंद्रेवाडीचा पदभार सोपविण्यात आला आहे. कडमुळीचे ग्रामसेवक सुशील गायकवाड यांच्याकडे देवंग्रा ग्रामपंचायतीचा पदभार दिला आहे. महाळंग्रा येथील ग्रामसेवक हरिचंद्र गोडभरले यांच्याकडे महाळंग्रावाडीचा पदभार आहे. कबनसांगवीचे विष्णू जाधव यांच्याकडे उजळंब गावाचा भार आहे. गांजूरवाडीचा पदभार मठवती यांच्यावर आहे. नागदावाडीचे राहूल कांबळे यांच्या कडे झरी (बु.) गावाचा अतिरक्त पदभार दिला आहे. मोहनाळचा पदभार एस.व्ही. स्वामी यांच्याकडे आहे. घरणीचे ग्रामसेवक तातेराव खाडे यांच्याकडे वडवळ नागनाथचा भार आहे. चापोलीचे हणमंत मुरुडकर यांच्याकडे हाणमंत जवळगा गावाचा भार आहे. हाडोळीचे सचिन मुंडेवर यांच्याकडे आनंदवाडी येथील पदभार देण्यात आला आहे. शिवणखेड (बु.) येथील नेताजी पानाडे यांच्यावर देवंग्रा गावाचा भार आहे. तिवघाळच्या प्रतिभा पाटील यांच्यावर तिवटघाळचाच भार आहे. नांदगावचे योगीराज पांचाळ यांच्यावर आष्टा गावाचा अतिरिक्त भार आहे. आष्टाचे ग्रामसेवक संजय जाधव हे निलंबित झाले आहेत. टाकळगावचे पांडुरंग सावत यांच्यावर वडगाव (एक्की) गावाचा पदभार देण्यात आला आहे. रायन्नावाडीचे जनार्धन साबदे यांच्यावर जानवळचा पदभार देण्यात आला आहे. नळेगावचे सुनील शिंगे यांच्यावर लातूररोड ग्रामपंचायतीचा भार देण्यात आला आहे. बोरगाव (बु.) येथील पिराजी शेटवाड यांच्याकडे मष्णनेरवाडीचा पदभार देण्यात आला आहे. सुगावचे गौतम श्रृंगारे यांच्यावर मुरंबीचा भार दिला आहे. मांडुरकीचे रमाकांत तोगरवे यांचे वर आटोळा गावचा भार देण्यात आला आहे. तर घारोळाचे बालासाहेब वडुळकर यांच्यावर अंबूलगा आणि मोहदळचा भार देण्यात आला आहे.
नागरिकांच्या साेयीसाठी अतिरिक्त भार...
चाकूर तालुक्यातील एकूण ५५ पैकी सध्याला कार्यरत असलेल्या ५० ग्रामसेवकांकडे एकूण ७१ गावांचा कारभार आहे. मूळ पदस्थापना असलेल्या गावच्या ग्रामपंचायतीबराेबरच इतर ग्रामपंचायतीचाही भार सांभाळत कारभार केला जात आहे. हा कारभार सांभाळणे तसे कठीण आहे. मात्र, ग्रामसेवकांची संख्या कमी आहे. परिणामी, एका ग्रामसेवकावर दुसऱ्या ग्रामपंचायतीचा भार देण्यावत आला आहे. नागरिकांची गावापातळीवरील कामे वेळेवर व्हावीत, यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असे चाकूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वैजनाथ लोखंडे म्हणाले.