उस्तुरी ग्रामपंचायतीची सदस्य संख्या ११ असून येथील निवडणुकीत मल्लिकार्जुन दानाई यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला ८ तर संतोष शेट्टे यांच्या पॅनलला ३ जागा मिळाल्या होत्या. सरपंच पद हे खुले होते. गुरूवारी अध्यासी अधिकारी बी.पी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नूतन सदस्यांची बैठक होऊन सरपंचपदी मल्लिकार्जुन दानाई तर उपसरपंचपदी सुवर्णा गुंजोटे यांची निवड झाली. यावेळी नूतन सदस्य सिध्देश्वर जावळे, सतीश काळे, संगिता मुळे, सुमन बडुरे, कमलाबाई गोपाळे, सावित्रा इरले, ग्रामसेवक डी.एन. सुतार उपस्थित होते. नूतन सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा सत्कार करण्यात आले. यावेळी दतात्रय गुंजोटे, संजय मुळे, शिवदत्त गुंजोटे, भालचंद्र पाटील, नरसिंग मुळे, विलास बालकुंदे, सचिन दानाई, विकास बिराजदार आदी उपस्थित होते.
उस्तुरीच्या सरपंचपदी मल्लिकार्जून दानाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:19 IST