लातूर : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या वतीने होळी करा लहान, पोळी करा दान हा उपक्रम रविवारी राबविण्यात आला.
रस्त्यावर जीवघेणी सर्कस करून पोटाची खळगी भरण्यासाठी कलाकुसर करणा-या कुटुंबांना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या पदाधिका-यांनी पोळ्या व दुधाचे वाटप केले. तसेच रस्त्याच्या कडेला पाल ठोकून राहणा-या कुटुंबालाही पोळ्या , दुधाचे वाटप करण्यात आले. इतर वस्त्यांमध्ये जावून होळी करा लहान पोळी करा दान, असा संदेश देण्यात आला. त्यानुसार कार्यकर्त्यांनी पोटा- पाण्यासाठी भटकंती करणा-या नागरिकांच्या पालवस्तीवर जावून होळी सणाचे औचित्य साधून पोळी व दुधाचे वाटप केले. यावेळी अंनिसचे प्रधान सचिव माधव बावगे, जिल्हा कार्याध्यक्ष अनिल दरेकर, सुधीर भोसले, डाॅ. दशरथ भिसे, ऋषिकेश दरेकर, वैशाली लोंढे, प्रमोद निपाणीकर , डी. एम. पाटील, मनमोहन डागा, सुलेखा कारेपूरकर आदी सहभागी झाले होते.