शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणने नळयोजनेचा वीजपुरवठा पुन्हा तोडला; औश्यात निर्जळी!

By हरी मोकाशे | Updated: March 25, 2023 16:04 IST

औसा नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे महावितरणाची जवळपास दीड ते दोन कोटी रुपयांची थकबाकी आहे.

औसा : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्राचा वीजपुरवठा शुक्रवारी बंद करण्यात आला. पालिकेकडे जवळपास दीड कोटींची थकबाकी असून, ती न भरल्यामुळे महावितरणाने ही कारवाई केली. वीज खंडित करण्याची ही चौथी वेळ आहे. परिणामी, शहराचा पाणीपुरवठा बंद झाल्याने उन्हाळ्यात नागरिकांना निर्जळीचा सामना करावा लागत आहे.

औसा नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे महावितरणाची जवळपास दीड ते दोन कोटी रुपयांची थकबाकी आहे. पालिकेने केवळ १० ते २० लाख रुपये भरले आहेत. संपूर्ण वीजबिल भरण्याबाबत महावितरणकडून सातत्याने तगादा सुरु आहे. नळपट्टी वसुलीचे प्रमाण अत्यंत कमी असल्यामुळे संपूर्ण रक्कम भरण्यास पालिका असमर्थ आहे, असे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अभियंता सोनवणे यांनी सांगितले.

शहरात सध्या ४ हजार ३०० अधिकृत नळ कनेक्शन असून अनधिकृत नळ कनेक्शनची संख्याही तेवढीच असल्याची माहिती पालिकेचे कार्यालयीन अधीक्षक प्रदीप पाटील यांनी दिली. मासिक १५ ते २० लाख रुपये वीजबिल येत असून, पाणीपट्टीची वसुली केवळ २ लाख रुपये होत असल्याचेही पाटील यांनी सांगितले. शहरातील सर्व अनधिकृत नळ कनेक्शन शोधून ते बंद करण्याची मोहीम सुरू केली असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्यामुळे शहरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण होत आहे. त्याचा फायदा खाजगी पाणीपुरवठा करणाऱ्या टँकर चालकांना होत आहे.

पाणीपुरवठा योजनेचा विद्युत पुरवठा महावितरणने बंद केला आहे. थकबाकी भरण्यासंदर्भात महावितरण कार्यालयाने पत्र दिले आहे. शहरातील सर्वच सार्वजनिक बोअर (कुपनलिका) पालिकेने तात्काळ बंद केले असून, त्याचा वीजबिल भरणा करणे शक्य नाही. त्यामुळे त्याचे स्टार्टर काढून कनेक्शन बंद केले आहेत. अनधिकृत नळ कनेक्शन बंद करण्याची मोहीम राबवली जात असून दोन दिवसांत जवळपास २०० कनेक्शन बंद केले आहेत. शहरातील नळधारकांनी नळपट्टीची बाकी भरुन सहकार्य करावे.- अजिंक्य रणदिवे, मुख्याधिकारी.

टॅग्स :laturलातूरmahavitaranमहावितरण