शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

महाराष्ट्र लवकरच दुष्काळमुक्त होणार, महाराष्ट्र दिनी आमीर खानचे फत्तेपुरात महाश्रमदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 05:28 IST

राजकुमार जोंधळे/ महेबुब बक्षीलातूर / औसा : दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी औसा तालुक्यात ‘तुफान’ आले असून, आपले गाव पाणीदार करण्यासाठी महाराष्ट्र दिनी फत्तेपूर येथे महाश्रमदान करण्यात आले. या वेळी पाणी फाउंडेशनचे प्रमुख अभिनेता आमीर खान याने सपत्नीक एक तास श्रमदान केले.मनात महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याची संकल्प घेऊन श्रमदान करणाऱ्यांना आमीरच्या श्रमदानाने ...

राजकुमार जोंधळे/ महेबुब बक्षीलातूर / औसा : दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी औसा तालुक्यात ‘तुफान’ आले असून, आपले गाव पाणीदार करण्यासाठी महाराष्ट्र दिनी फत्तेपूर येथे महाश्रमदान करण्यात आले. या वेळी पाणी फाउंडेशनचे प्रमुख अभिनेता आमीर खान याने सपत्नीक एक तास श्रमदान केले.मनात महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याची संकल्प घेऊन श्रमदान करणाऱ्यांना आमीरच्या श्रमदानाने प्रेरणा मिळाली. ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ यासह वृक्षारोपण, मातीचे परीक्षण, मातीची झिज रोखून त्यामधील गुणधमार्ची पुर्तता करावे लागणार आहे. पिकांचे नियोजन करण्याची गरज आहे. आजचे श्रमदान तुमच्या भावी पिढीच्या सुरक्षिततेसाठी महत्वाचे ठरणार आहे. सर्वांनीच या स्पर्धेत सहभागी व्हावे. यात कुणाची हार होणार नसून प्रत्येक जण विजेताच ठरणार आहे. शहरी भागातील नागरिकांनीही पाणलोटची कामे करावीत. त्यांच्यासाठीही स्पर्धा सुरू केली जाईल, असे अभिनेता अमिर खान याने सांगितले.महाराष्ट्र दिनाच्यानिमित्ताने औसा तालुक्यातील फत्तेपुर येथे सकाळी ६:४५ वाजल्यापासून श्रमदान करण्यात आले. यासाठी अभिनेत्री आलिया भटसह संपूर्ण राज्यात पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून तुफान आणणारे अमीर खानही आले होते. त्यांनी येताच हातात टिकाव, खोºया घेत एक तास श्रमदान केले. यावेळी स्वयंसेवी संस्था, कॉलेज, शाळा, गावकरी, संघटनेचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांनी महाश्रमदानात सहभाग घेतला. श्रमदानानंतर त्यांनी प्रत्येकांच्या या उपक्रमाबाबत प्रतिक्रिया ऐकल्या. दिलखुलासपणे अमिरने गावकºयांशी संवाद साधला.मराठवाड्यात दारिद्रय असण्याचे मुख्य कारण पाणीटंचाई आणि दुष्काळ आहे. अमिर म्हणाला, तुमची थोडी मेहनत तुमच्यासह भावी पिढीचे कल्याण करणार आहे. आपले गाव पाणीदार बनले की आपोआप दारिद्रय संपुष्टात येईल.उत्पन्न वाढेल आणि लोक मुंबई, पुणे सोडून तुमच्या गावाजवळील शहरात येतील. लातूरला येणाºयाचा ओघ वाढेल. त्याकरिता ग्रामीण भागासह शहरी भागातील जनतेनेही आतापासूनच पाणलोटची कामे करावी. जेणेकरून भविष्यात दुष्काळाशी सामना करावा लागणार नाही.आमदाराकडून गावांना बक्षीसपाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावणाºया गावांना आ. बसवराज पाटील यांच्याकडून प्रत्येकी दहा, पाच आणि तीन लाखांचे बक्षीस देण्याची घोषणा शरण पाटील यांनी केली.अगर आप न होते तोहम न होते... आलिया भटग्रामीण भागातील शेतकरी काबाडकष्ट करुन अन्नधान्य पिकवतो. तुमच्या मेहनतीमुळेच आम्हाला अन्न मिळते. याची प्रचिती आज मला आली आहे. तुम्ही जे करता, ते दुसरे कुणीही करु शकत नाही. मला तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. मी प्रार्थना करते देवाला प्रत्येक गाव पाणीदार झाले पाहीजे. जेणेकरून दुष्काळ पुन्हा येणार नाही आणि शेतकºयांना आत्महत्या कराव्या लागणार नाहीत, असे आलिया भट हिने सांगितले.मिस्टर परफेक्शनिस्टला घ्यावे लागले चारदा रिटेकहंचनाळ (जि लातूर) : पाणी फाउंडेशनच्या उपक्रमांतर्गत आमीर खान लातूर जिल्ह्यातील हंचनाळ या खेडेगावी छोट्याशा चित्रीकरणासाठी आणि कामांच्या पाहणीसाठी आला होता. यावेळी गावातील शोषखड्डयामुळे विहिरींच्या वाढलेल्या पाण्याविषयी आमिरला एक सीन करायचा होता. यात तो सुरुवातीला एक डायलॉग सांगून विहिरीतील पाणी दाखवणार होता. मात्र, चित्रीकरणाच्या वेळी बघ्यांच्या गोंगाटामुळे सीन ओके होत नव्हता. त्यामुळे तीन रिटेक झाले. चौथ्यांदा स्वत: आमिरच डायलॉगमधील काही शब्द विसरला. त्यामुळे चौथा रिटेक झाला. अखेर पाचव्यांदा आमिरने नागरिकांना विनंती केल्यानंतर ते शांत झाले व सीन ओके झाला.वर्धा : सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत आता बरीच रंगत आली आहे. जिल्ह्यातील चार तालुक्यांतील २१० गावांत जलसंधारण कामांसाठी हजारो हात सरसावले आहेत. दररोज महाश्रमदानातून गावांना जलमय करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. वॉटर कप ही आता केवळ स्पर्धा राहिली नाही तर तिला लोकचळवळीचे स्वरूप आल्याचेच दिसत आहे.खूबगाव येथे सर्वपक्षीय श्रमदानआर्वी : खुबगाव येथील वाठोडा मार्गावर सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेतील जलसंधारणाच्या कामांनी चांगलाच वेग घेतला आहे. ही स्पर्धा आता लोकचळवळ झाली असून यात गावातील सुशिक्षीत युवा पिढी, गृहीणी, महिला सरपंचा सोबतच आ. अमर काळे, पं.स. उपसभापती धर्मेंद्र राऊत, डॉ. रिपल राणे, पत्रकार, वकील यांच्यासह १०० ते १५० लोकांनी श्रमदानात भाग घेतला. खुबगाव शिवारात सुमारे दोन तास चाललेल्या श्रमदानात १४५ घनमीटर काम झाले. लहान-थोरांपासून विविध सामाजिक संघटनांनी तथा राजकीय पक्ष, संघटनेचे पदाधिकारी तथा महिला पुरूषांनी न थकता परिश्रम करीत सहभाग घेतला. सर्वांनी टिकास, फावडे, टोपले घेऊन आपापली जबाबदारी समजून श्रमदान केले. श्रमदान करण्याकरिता आ. अमर काळे, नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे, लॉयन्स क्लबचे रिपल राणे, माजी न.प. उपाध्यक्ष पुरूषोत्तम नागपुरे, सुशील ठाकुर, परवेज साबीर, मित्रपरिवाराचे गौरव जाजू, पर्यावरण समितीचे पदाधिकारी, खुबगावच्या सरपंच वनमाला काळपांडे, उपसरपंच दिलीप गवळी, पं.स. सदस्य अशोक तुमडाम, प्रमोद मोहोड, देवराव भाकरे, ग्रा.पं. सदस्य, महिला बचत गटांनी श्रमदान केले. आ. काळे यांनी आतापासूनच पाण्याची बचत कशी करता येईल, यासाठी जनतेने सर्तक राहण्याचे आवाहन केले.जलमित्र परिवार सालई येथे महाश्रमदानहिंगणी : सेलू तालुक्यातील सालई (पेवट) येथेही पाणी फाऊंडेशन अंतर्गत महाश्रमदान केले जात आहे. त्यांना प्रोत्साहन देतानाच ग्रामस्थांचा सहभाग वाढावा म्हणून हिंगणी येथील जल मित्र परिवाराने प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन विविध उपक्रम राबविण्यास प्रारंभ केला. हातात टिकास, फावडे व टोपले घेऊन ते काम करीत असून पाणी संवर्धनाचे महत्त्व पटवून देत आहेत. समाजातील विविध बाबींवर जल मित्र परिवार सामाजिक बांधीलकी जोपासत श्रमदानात प्रत्यक्ष सहभाग घेत आहे. यात ४० मुले तथा गावातील वृद्ध, युवक, महिला, चिमुकले राबत आहेत. तत्पूर्वी बोरी, बोरधरण येथे श्रमदान केले. अन्य गावांतही ते पोहोचणार आहेत.परसोडीतशिक्षकांचे श्रमदानविरुळ (आकाजी) : वाटर कप स्पर्धेत सहभागी परसोडी गावात श्रमदानाचे तुफान कायम आहे. गावातील महिला, पुरुष, युवक तथा चिमुकले सकाळी ६ ते दुपारी १२ वाजेपर्यंत अविरत श्रमदान करीत आहे. जिल्ह्यातील अनेक सामाजिक संघटनांनी परसोडी येथे श्रमदान केले. नेहरु विद्यालय विरुळ, विवेक महाविद्यालय मांडवा येथील शिक्षकांनीही गावात श्रमदान केले. सर्वांनी मिळून अवघ्या चार तासांतच २१० मिटर मीठाईचा बांध खोदला. सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात हा कार्यक्रम बांधावरच ऐकला.

टॅग्स :Water Cup Competitionवॉटर कप स्पर्धाAamir Khanआमिर खान