शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

Lok Sabha Election 2019 : लातुर लोकसभेसाठी अपक्षांची भाऊगर्दी घटली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 17:51 IST

यंदाच्या निवडणुकीत अपक्षांनी फारसा रस दाखविला नाही़

ठळक मुद्देयंदा दोन अपक्षच रिंगणात १९९६ च्या निवडणुकीत सर्वाधिक २० अपक्ष लढले

लातूर : लातूर लोकसभेच्या आजवर झालेल्या ११ सार्वत्रिक निवडणुकांपैकी सर्वाधिक २० अपक्ष १९९६ च्या निवडणुकीत लढले़ मतदारांनी अपक्षांना फारसे पाठबळ दिले नाही. २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत १३ जणांनी नशीब आजमावले होते़ त्यांना केवळ ३़१४ टक्के मिळाली़ मागील निवडणुकीचा अंदाज लक्षात घेता यंदाच्या निवडणुकीत अपक्षांनी फारसा रस दाखविला नाही़ ४७ जणांनी १४३ अर्ज घेतले होते़ यातून केवळ १५ जणांनीच उमेदवारी दाखल केली होती़  तिघांचे अर्ज बाद झाले तर दोघांनी माघार घेतली आहे़

लोकसभा निवडणुकीत १९९६ पर्यंतच अपक्षांची भाऊगर्दी जास्त होती़ परंतु या मतदारसंघातून मतदारांचे पाठबळ मिळाले नाही़ नऊ निवडणुकीत अपक्षांची दैना उडाली आहे़ आतापर्यंत झालेल्या निवडणुकांमध्ये ७७ अपक्षांनी नशीब आजमावले आहे़ आजवरच्या इतिहासात अ‍ॅड़ मनोहरराव गोमारे व एम़एस़ सोनवणे या दोन अपक्षांनीच मतदारसंघात समाधानकारक मते घेत लक्षणीय कामगिरी केली आहे़ त्यांनाही पराभवाचा सामना करावा लागला आहे़ १९७७ मध्ये झालेल्या पहिल्या निवडणुकीत केवळ एकच अपक्ष रिंगणात होता़ त्यांना केवळ २ हजार ४९७ मते मिळाली़ १९८० च्या निवडणुकीत सातपैकी चार अपक्ष होते़ यावेळी मात्र अपक्षांच्या मताचा टक्का वाढला असून एकूण मतदानाच्या १९़१२ टक्के (८१, ३३९) मते मिळाली़ यात अपक्ष उमेदवार एम़एस़ सोनवणे यांना ६४ हजार ८१ मते मिळाल्याने अपक्षांचा टक्का वाढला होता

१९८४ च्या निवडणुकीत ९ पैकी ७ उमेदवार अपक्ष होते़ परंतु यात एकालाही ठसा उमटविता आला नाही़ सर्वांना मिळून ३७ हजार ६२० मते पडली होती़ १९८९ ला आठपैकी पाच उमेदवार अपक्ष होते़ यावेळी अपक्षांच्या मताची टक्केवारी चांगलीच घसरली़ केवळ १२ हजार ८४३ मतदारांनीच अपक्षांना पाठबळ दिले़ १९९८ च्या निवडणुकीत ४ अपक्षांनी नशीब आजमावले़ त्यांना फक्त ९ हजार ८०८ मते मिळाली़ ९९ साली झालेल्या निवडणुकीत तीन अपक्षांनी निवडणूक लढविली़ त्यांना ९ हजार १५७ मते मिळाली होती़ २००४ च्या लोकसभा निवडणुकीत ४ अपक्ष होते़ त्यांना २० हजार ७१२ मते मिळाली़ २००९ च्या निवडणुकीतील ५ उमेदवार, २०१४ च्या निवडणुकीत १३ जणांनी निवडणूक लढविली. 

अपक्षांत गोमारे यांना लाखांवर मते...१९९१ च्या लोकसभा निवडणुकीत ११ अपक्षांनी नशीब आजमावले़ यात समाजवादी नेते अ‍ॅड़ मनोहरराव गोमारे यांना १ लाख २३ हजार ५०६ मते मिळाली़ इतर १० अपक्षांचे एकत्रित ११ हजार ५८५ मते मिळाली होती़

यंदाच्या निवडणुकीत संख्या घटली...गेल्या ११ सार्वत्रिक निवडणुकांत अ‍ॅड. मनोहरराव गोमारे यांचा अपवाद वगळता मतदारांनी कोणालाही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे यंदाच्या सार्वत्रिक निवडणुकीत अपक्षांचे प्रमाण घटले असून, केवळ दोघेजण अपक्ष म्हणून रिंगणात आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकlatur-pcलातूरVotingमतदान