शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

सार्वजनिक मंडळांना चार तर घरगुती गणेश मंडळांना दोन फुटांच्या श्रीगणेश मूर्तीची मर्यादा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:24 IST

कोरोना काळ असल्यामुळे गतवर्षी सर्व गणेश मंडळांनी अत्यंत साधेपणाने व मंगलमय वातावरणात गणेशोत्सव साजरा करून लातूरची गौरवशाली परंपरा निर्माण ...

कोरोना काळ असल्यामुळे गतवर्षी सर्व गणेश मंडळांनी अत्यंत साधेपणाने व मंगलमय वातावरणात गणेशोत्सव साजरा करून लातूरची गौरवशाली परंपरा निर्माण केली आहे. यंदाही गत वर्षीप्रमाणेच गणेश उत्सव साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या डीपीडीसी सभागृहात सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त शांतता समितीची बैठक झाली यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी साधेपणाने आणि मंगलमय वातावरणात गणेश उत्सव साजरा करण्याचे ह आवाहन केले. सार्वजनिक ठिकाणी गणेश मंडळ स्थापन करण्याची परवानगी नसल्याने आपापल्या घरांमध्ये, गळ्यामध्ये, मंदिरामध्ये,खाजगी पक्क्या इमारतींच्या ठिकाणी गणेश मूर्तीची स्थापना करावी.गणेश उत्सव साजरा करताना डॉल्बी,डीजेचा वापर करू नये, असे सूचित केले. कायदे भंग केल्यास त्यावर कारवाई करण्यात येईल अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.जिल्ह्यात जवळपास ९२ हजार कोरोना केसेस नोंद झाल्या आहेत. त्यापैकी २४५० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोना लसीकरणसारखे आरोग्यविषयक कार्यक्रम राबवून जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, अशाही सूचना करण्यात आल्या. बॅनर, पोस्टरसाठी महानगरपालिकेची पूर्वपरवानगी घ्याण्याची सूचना यावेळी करण्यात आली.

श्री गणेश दर्शनासाठी ऑनलाइनची सोय हवी...

गणेश मंडळांनी महाप्रसादाचे अथवा अन्य गर्दी होईल असे कार्यक्रम आयोजित करू नयेत.भाविकांना श्री गणेश मूर्तीचे दर्शन घेता यावे,यासाठी ऑनलाईन पद्धत करण्याबाबत विचार करावा. स्थापनेच्या ठिकाणी थर्मल स्क्रीनिंग, सनीटायझर आदीची व्यवस्था करावी. श्रीचे आगमन आणि विसर्जन मिरवणूक काढण्यास पूर्णपणे बंदी आहे. तसेच आपल्या भागातील छोट्या मोठ्या गणेश मूर्तींचे विसर्जन एकाच वेळी करण्याची व्यवस्था करण्यात यावी. विसर्जनाच्या ठिकाणी पर्यावरणास अनुरूप नियमांचे पालन करुन श्री गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात यावे असेही यावेळी सांगण्यात आले.

७५ डेसीबलपेक्षा जास्त आवाजाची उपकरणे लावण्यास प्रतिबंध....

बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, अपर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव,निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, उपविभागीय अधिकारी सुनील यादव, तहसीलदार स्वप्नील पवार, राज्य उत्पादन शुल्कचे उपाधीक्षक गणेश बारगजे, उपविभागीय पोलिस अधिकारी जितेंद्र जगदाळे, पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील, मनपा उपायुक्त श्रीमती शिंदेकर, कार्यकारी अभियंता बाबासाहेब थोरात, महावितरणचे कार्यकारी अभियंता समसे,जिल्हा कारागृहाचे चौधरी, पोलीस निरीक्षक पुजारी,तिडके, माकोडे, मिरकले, कदम आदींची उपस्थिती होती. डीजे,डॉल्बी नव्हे तर लाऊड स्पीकरचाही काही वापर करू नये. ७५ डेसीबल पेक्षा जास्त आवाजाचे कोणतेही उपकरण लावण्यास प्रतिबंध आहे असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी यावेळी सांगितले.