शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीला पेट्रोल टाकून जाळणाऱ्या पतीला जन्मठेप; लातूर जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल

By आशपाक पठाण | Updated: December 14, 2023 19:51 IST

विवाहितेस माहेरहून सोने व कपडे खरेदी करण्यासाठी पैसे घेऊन ये म्हणून स्वतःच्या लहान मुलासमोर अंगावर पेट्रोल टाकून पत्नीचा खून केल्याची घटना घडली होती.

लातूर : विवाहितेस माहेरहून सोने व कपडे खरेदी करण्यासाठी पैसे घेऊन ये म्हणून स्वतःच्या लहान मुलासमोर अंगावर पेट्रोल टाकून पत्नीचा खून केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी लातूर जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीस जन्मठेपेची शिक्षा गुरुवारी सुनावली आहे. मयत विवाहिता जयाबाई गजानन चक्रे (रा. बौद्ध नगर, लातूर) यांना पती गजानन एकनाथ चक्रे व दीर संतोष एकनाथ चक्रे हे तू माहेरहून घर चालविण्यासाठी व घर बांधणीसाठी पैसे घेऊन ये म्हणून नेहमी मारहाण करून त्रास देत होते. दीर संतोष चक्रे याच्या मेव्हण्याला मुलगा झाला आहे, त्याला कपडे व सोने खरेदी करण्यासाठी तुझ्या माहेरहून पैसे आणत नाहीस याचा राग धरून १३ जानेवारी २०२१ रोजी राहते घरी आरोपी गजानन चक्रे व संतोष चक्रे यांनी जयाबाई हिचे अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले होते. त्यात जयाबाई ही ४० टक्के भाजल्याने तिचेवर सरकारी दवाखाना लातूर येथे उपचार चालू असताना १२ फेब्रुवारी ती मयत झाली होती. याप्रकरणी विवेकानंद चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तद्नंतर दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. प्रत्यक्षदर्शी व माहीतगार साक्षीदार यांचे जबाब नोंदवून तपास अधिकारी सपोनि. दयानंद पाटील यांनी दोषारोपपत्र दाखल केले होते.

९ जणांच्या साक्षीत, लहान मुलाची साक्ष ठरली महत्त्वाची...प्रकरणाची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.बी.रोटे यांचे समोर झाली. यात ९ साक्षीदारांच्या जबानी नोंदविण्यात आल्या. सदरचा खून हा मयताचा लहान मुलगा याचे समोर झाल्याने त्याने तशी साक्ष न्यायालयात दिली. मुलाची जबानी ग्राह्य धरून समर्थनीय पुरावा आल्याने आरोपी गजानन एकनाथ चक्रे (४०) यास कलम ३०२ खाली दोषी ठरवत जन्मठेप, तर कलम ४९८(अ) खाली २ वर्ष शिक्षा व ५०० रू. दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली. या प्रकरणी तपासात पोना. वाजीद चिखले, पैरवी अंमलदार म्हणून कोतवाड यांनी काम पाहिले. विवेकांनद चौक ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर यांनी वेळोवेळी आरोपींना समन्स, वॉरंट बजावणीसंदर्भात पाठपुरावा केला. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता जयश्री यू. पवार यांनी काम पाहिले.

टॅग्स :laturलातूरCourtन्यायालय