शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून आघाडी सरकारची वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:21 IST

येथील सामान्य रुग्णालयात कोविड निदान प्रयोगशाळा व ऑक्सिजननिर्मिती युनिटच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राज्यमंत्री संजय बनसोडे होते. यावेळी ...

येथील सामान्य रुग्णालयात कोविड निदान प्रयोगशाळा व ऑक्सिजननिर्मिती युनिटच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राज्यमंत्री संजय बनसोडे होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार रामेश्वर गोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनियल बेन, नगराध्यक्ष बसवराज बागबंदे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजेश्वर निटुरे, बाजार समिती सभापती सिद्धेश्वर पाटील, उपसभापती रामराव बिरादार, कल्याण पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, आरोग्य उपसंचालक डॉ. एकनाथ माले, डॉ. सतीश हरिदास, डॉ. दत्तात्रय पवार, डॉ. शशिकांत देशपांडे, प्रा. शिवाजी मुळे, बाळासाहेब मरलापल्ले, शेख समीर, विजय निटुरे, चंदन पाटील आदी उपस्थित होते.

राज्यमंत्री बनसोडे यांचा पाठपुरावा...

पालकमंत्री अमित देशमुख म्हणाले, कोरोना महामारीमुळे वैद्यकीय क्षेत्रात आमूलाग्र बदल झाले. हा बदल घडताना देशातच नव्हे, तर संपूर्ण जगाने नोंद घ्यावी, असे काम महाराष्ट्राने केले. कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी राज्यात केवळ दोनच प्रयोगशाळा होत्या. आता ५५० पेक्षा जास्त प्रयोगशाळा अस्तित्वात आल्या आहेत. उदगीरची ही प्रयोगशाळा मराठवाड्यात पहिलीच असून, त्यासाठी राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी सातत्याने प्रयत्न केले. कोरोनावर औषध उपलब्ध नसल्याने दक्षता हाच त्यावर उपाय आहे. पक्ष हा निवडणुकीपुरता असतो. विधानसभेत गेल्यानंतर सामान्यांच्या विकासाचे काम सरकारचे असते. त्यामुळे महाविकास आघाडी शासन पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करील. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात पक्षाच्या आदेशानुसार कार्यकर्त्यांनी स्वबळाची तयारी करावी, असेही ते म्हणाले.

उदगीरला लवकरच लिंबोटीचे पाणी...

राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणाले, मांजरा नदीवरील बॅरेजेसप्रमाणे उदगीर तालुक्यातील तिरू नदीवरील सात बॅरेजेसला मान्यता मिळाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडवून आणण्याचा आपला मानस आहे. पालकमंत्री अमित देशमुख यांच्यामुळे उदगीरच्या कोविड चाचणी प्रयोगशाळेस मंजुरी व गती मिळाली. उदगीर शहरासाठी लिंबोटीचे पाणी हा जिव्हाळ्याचा प्रश्न असून, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे कामाची गती मंदावली होती. आता ते काम अधिक गतीने सुरू असून, लवकरच शहराला लिंबोटीचे पाणी मिळणार आहे.