शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

Latur: साडेबारा हजार शेतकरी लाभार्थ्यांच्या खात्यावर तीन महिन्यांचा लाभ, जळकोट तालुक्यात कामाला गती येईना

By आशपाक पठाण | Updated: August 1, 2023 18:01 IST

Latur News: राज्य शासनाने १ जानेवारीपासून शेतकरी रेशन कार्डधारकांना धान्याऐवजी रोख रक्कम देण्याचा निर्णय घेतला. त्यात काही निकष लावण्यात आल्याने कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात लाभार्थ्यांची धावपळ होत आहे.

- आशपाक पठाण लातूर  - राज्य शासनाने १ जानेवारीपासून शेतकरी रेशन कार्डधारकांना धान्याऐवजी रोख रक्कम देण्याचा निर्णय घेतला. त्यात काही निकष लावण्यात आल्याने कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात लाभार्थ्यांची धावपळ होत आहे. जिल्हा पुरवठा विभागाला शासनाने निधी दिला असून आतापर्यंत १२ हजार ४४९ लाभार्थ्यांच्या खात्यावर ५६ लाख रूपये वर्ग करण्यात आले आहेत. निधी वाटपात चाकूर, लातूर, अहमदपूर तालुक्यातील लाभार्थी अधिक असून इतर तालुक्यात कामाला गती येण्याची गरज आहे.

लातूर जिल्ह्यात शेतकरी लाभार्थी ५२ हजार ९४३ इतकी आहेत. यात त्यांच्या कुटुंबालील लाभार्थी संदस्यांची संख्या २ लाख ४८ हजार ६७० आहे. या सर्व लाभार्थ्यांना दरमहा दीडशे रूपयांप्रमाणे कुटुंब प्रमुख महिलेच्या नावाने रक्कम द्यायची आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेक ठिकाणी लाभार्थीच उदासिन असल्याचे दिसून येत आहे. सहा महिन्यांपासून अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया सुरू असली तरी अजूनही जवळपास ३२ टक्के लाभार्थ्यांनी अर्जही भरून दिले नाहीत. शिवाय, ज्यांनी दिले त्यांची डाटा एन्ट्री तालुकास्तरावर केली जात आहे. जिल्हास्तरावर आलेल्या यादीत सर्व पडताळणी करून लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग करण्यात येत आहे. आतापर्यंत १२ हजार ४४९ कुटुंबियांच्या खात्यावर जवळपास ५६ लाख रूपये वर्ग करण्यात आले आहेत.यात सर्वाधिक लाभार्थी चाकूर तालुक्यातील आहेत.

रक्कम वाटपात चाकूरची आघाडी...लातूर जिल्ह्यात लाभार्थ्यांना जानेवारी ते मार्च, एप्रिल ते जून असे दोन टप्प्यात सहा महिन्यांचे धान्याऐवजी रक्कम देण्यासाठी पुरवठा विभागाकडे निधी वर्ग करण्यात आला आहे. प्रति लाभार्थी १५० रूपयांप्रमाणे अडीच लाख लाभार्थ्यांना सहा महिन्यांची रक्कम मिळणार आहे. यासाठी २३ कोटी ६८ लाखांचा निधी पुरवठ्याकडे आला आहे. चाकूर तालक्यात सर्वाधिक ३९७७ जणांच्या खात्यावर १७ लाख ८९हजार ६५० रूपयांची रक्कम वर्ग झाली आहे.

तालुकास्तरावर कामाला गती यावी...तालुकास्तरावर अनेक ठिकाणी मनुष्यबळाचा अभाव आहे. त्यामुळे डाटा एन्ट्री गतीने होत नाही. शिवाय, ३० टक्के लाभार्थ्यांनी अजून अर्जही दाखल केले नाहीत. तहसीलस्तरावर जवळपास ६८.२९ टक्के अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यातील ४८.८९ टक्के अर्जाची डाटा एन्ट्री केली आहे. १२ हजार ४४९ लाभार्थ्यांच्या खात्यावर तीन महिन्याचे ५६ लाख १ हजार ९०० रूपये वर्ग करण्यात आले आहेत.- प्रियंका कांबळे (आयरे, जिल्हा पुरवठा अधिकारी, लातूर)

 एकुण लाभार्थी संख्या : ५३०६३निधी वाटप लाभार्थी : १२४४९आजवर दिलेला निधी : ५६०१९००

टॅग्स :Farmerशेतकरीlaturलातूर