शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

लातूर : येवरीच्या सरपंचपदासाठी उमेदवारच नाही, सदस्यांचीच होणार निवड!

By हरी मोकाशे | Updated: December 5, 2022 22:10 IST

१२ ग्रामपंचायतींसाठी ६५ अर्ज पात्र

लातूर : यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत थेट सरपंचाची निवड होणार असल्याने पॅनलमधील विजयी उमेदवारांची संख्या कमी-जास्त असली तरी चालेल. परंतु, सरपंचपद आपल्या गटाकडे रहावे म्हणून जोरदार व्यूहरचना आखली जात आहे. मात्र, तालुक्यातील येवरी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नसल्याने येथील सरपंचपद रिक्त राहणार आहे. तिथे केवळ सदस्यांसाठी निवडणूक होणार आहे.

जळकोट तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींसाठी निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. ग्रामपंचायतीवर आपले वर्चस्व रहावे म्हणून व्यूहरचना आखली जात आहे. जुन्या मोहऱ्यांविरुद्ध नवीन चेहऱ्यांनी शड्डू ठोकले आहेत. त्यामुळे थंडीच्या वातावरणात राजकीय वातावरण तापत आहे. निवडणूक होत असलेल्या गावांत जोरदार प्रचार सुरू झाला आहे.

दरम्यान, येवरी वगळता उर्वरित १२ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी ६६ तर सदस्यपदासाठी ३०२ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. या उमेदवारी अर्जांची सोमवारी तहसील कार्यालयात छाननी करण्यात आली. त्यात सरपंचपदासाठीचा आणि सदस्यपदासाठीचा प्रत्येकी एक अर्ज अवैध ठरला. त्यामुळे आता सरपंचपदासाठी ६५ तर सदस्यपदांसाठी ३०१ उमेदवारी अर्ज आहेत.

तालुक्यातील माळहिप्परगा, उमरदरा, जगळपूर, केकतशिंदगी, पाटोदा बु., गुत्ती, लाळी खु., उमरगा रेतू, होकर्णा, येवरी, हावरगा, चेरा, करंजी अशा गावांत रणधुमाळी सुरू आहे. राजकीयदृष्ट्या पाटोदा बु., करंजी, जगळपूर, माळहिप्परगा, केकतसिंदगी, लाळी खु. या गावांतील निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. बुधवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने त्याच दिवशी अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.

गावचा कारभारी होणार उपसरपंच...येवरी ग्रामपंचायत ही ७ सदस्यांची आहे. सरपंचपद हे ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित होते. मात्र, एकही अर्ज दाखल झाला नाही. सदस्यपदांसाठी १६ अर्ज दाखल होते. छाननीत एक अर्ज अपात्र ठरला आहे. सरपंचपदासाठी अर्ज नसल्याने हे पद रिक्त राहणार आहे. निवडणुकीनंतर तात्पुरत्या स्वरूपात उपसरपंच गावचा कारभार पाहतील. तद्नंतर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सरपंचपदासाठी पुन्हा आरक्षण सोडत होईल.सुरेखा स्वामी, तहसीलदार.

टॅग्स :laturलातूर