शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

सीईटीतही लातूर पॅटर्न

By admin | Updated: June 7, 2014 17:52 IST

लातूर : एमबीबीएस आणि डेन्टलच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी राज्यात घेण्यात आलेल्या सामाईक प्रवेश परीक्षेत (एमएच-सीईटी) लातूर येथील राजर्षी शाहू महाविद्यालयातील देवेश शिळीमकर हा विद्यार्थी

लातूर : एमबीबीएस आणि डेन्टलच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी राज्यात घेण्यात आलेल्या सामाईक प्रवेश परीक्षेत (एमएच-सीईटी) लातूर येथील राजर्षी शाहू महाविद्यालयातील देवेश शिळीमकर हा विद्यार्थी ६७८़२ गुण घेऊन राज्यात प्रथम, तर विपुल जाजू ६६६़२ गुण मिळवून द्वितीय आला आहे़ याशिवाय याच महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी एसटी, व्हीजे व एनटी या प्रवर्गातून राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला़ वैद्यकीय शिक्षण संचालनालयामार्फत ८ मे रोजी घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेचा निकाल गुरुवारी रात्री उशिरा संचालनालयाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. या परीक्षेत मेडिकल, डेन्टल अभ्यासक्रमासाठी ७ हजार ५०६ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. राज्यातील ३९० परीक्षा केंद्रांवर १ लाख ४८ हजार ३४९ विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. त्यापैकी ६५ हजार ६०७ मुले आणि ८२ हजार ७८७ विद्यार्थिनींनी ही परीक्षा दिली होती. यापैकी मेडिकल, डेन्टल अभ्यासक्रमांसाठी खुल्या प्रवर्गातून ४ हजार १११ आणि राखीव कोट्यातून ३ हजार ३९५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एनटी-३ या प्रवर्गातून लातूरच्या शाहू महाविद्यालयाचा गोविंद आदिनाथ सानप याने ६६० गुण संपादित करीत राज्यातून प्रथम क्रमांक पटकावला. वैभव चन्नप्पा पवार ५७०़२ गुण मिळवून व्हीजेएनटी प्रवर्गातून राज्यात प्रथम, राणी विठ्ठल पुजरवाड ५३१ गुण संपादन करीत एसटी प्रवर्गातून राज्यात प्रथम आली आहे़ तर एनटी-३ प्रवर्गातून सुभांगी नारायणराव फड (६९१़२) व सुशील सूर्यकांत गीते (५६२) यांनी राज्यातून अनुक्रमे द्वितीय व चतुर्थ क्रमांक मिळविला आहे़ गुुणपडताळणी करण्यासाठी विद्यार्थ्यांना ६ ते ९ जून या काळात अर्ज करता येणार आहेत. त्यानंतर १० जून रोजी संचालनालयाच्या संकेतस्थळावर अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात विद्यार्थ्यांकडून ४ केंद्रांवर प्राधान्य अर्ज भरून घेण्यात येणार आहेत. जुन्या पद्धतीने परीक्षा घ्यानिगेटीव्ह मार्किंग व सीबीएसई परीक्षेच्या धर्तीवर घेण्यात आलेली परीक्षा विद्यार्थ्यांना अवघड गेली. त्यामुळे जुन्या पद्धतीनेच परीक्षा घेण्यात यावी, अशी विनंती राज्य शासनाकडे करण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी सांगितले.